Home मराठवाडा गोपीचंदगड संस्कृती , विज्ञान आणी राजकारणाचा अचुक संगम – ह.भ. प. देवकर

गोपीचंदगड संस्कृती , विज्ञान आणी राजकारणाचा अचुक संगम – ह.भ. प. देवकर

38
0

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

परभणी / गंगाखेड- गोशाळेच्या भूमिपूजनाणे सुरुवात झालेला हा गोपीचंदगड भविष्यात संस्कृती ,विज्ञान आणि राजकारणाचा अचूक संगम बनेल असा विश्वास ह.भ.प. तुळशीदास महाराज देवकर यांनी गोपीचंद गडावर गुरुवारी (11 जुन) बोलताना व्यक्त केला. सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उभारण्यात येत असलेल्या गोशाळा भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोविंदराव यादव तर प्रमुख पाहुणे म्हणून ह भ प बाळासाहेब महाराज तरडे, योगशिक्षक अंकुश भारतीय, रामेश्वर भोसले पाटील ईसादकर, सुहास देशमाने, धनगर साम्राज्य सेनेचे राम भंडारे, नरोबा काळे ,राम रेखे आदींची उपस्थिती होती. धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या वाढदिवसाच्या साधून गोपीचंद गडावर गुरुवारी ह.भ.प. तुलशीदास महाराज देवकर यांच्या हस्ते संत मोतीराम महाराज गोशाळा भूमिपूजन समारंभ पार पडला. पुढे बोलताना देवकर महाराज म्हणाले गाय ही आपली माता आहे. तिचे रक्षण करण्याची जबाबदारी सखाराम बोबडे यांनी उचललेली आहे,गोशाळेच्या माध्यमातून भविष्यात या ठिकाणी गोमूत्र व शेणखत प्रक्रिया उद्योग स्थापन करून शेकडो लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. राजकारणाचा उपयोग समाजकारण आणि संस्कृती टिकवण्यासाठी केल्यास शेती व शेतकरी दोघांची सुधारणा होईल. अध्यक्षीय समारोप करताना गोविंद यादव यांनी सेंद्रिय शेती जिवंत ठेवणे गरजेचे असून त्यासाठी शेणखत महत्वाचा असल्याचे सांगत संत मोतीराम महाराज गोशाळा आणि गोपीचंद गडाच्या विकासासाठी आपण कटीबद्ध राहणार असल्याचे सांगितले. अंकुश भारतीय, रामेश्वर भोसले पाटील,बालासाहेब तरडे महाराज यांनीही गोरक्षणाचे महत्त्व पटवून दिले. शेवटी ह भ प संत देवयमाय तुळशीदास महाराज देवकर यांच्या हस्ते सखाराम बोबडे यांचा सत्कार करण्यात आला. लोकनेते आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली गोपीचंदगड शिवारातील सर्व शेतकऱ्यांना विकासाची द्वारे खुली झाली असून एकसंघ होऊन याचा फायदा घेण्याचे शेतकऱ्यांनी ठरवली पाहिजे असे म्हणत सखाराम बोबडे पडेगावकर यांनी आभार मानले. ग्यानबा बोबडे, सोनबा बोबडे यांनी मान्यवरांचा सत्कार केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुकुंद बोबडे, संभाजी बोबडे, दिगंबर बोबडे, अशिष बोबडे, दत्ता बोबडे,अविष्कार बोबडे, राम बोबडे सह गोपीचंदगड शिवारातील शेतकरीवर्गाने प्रयत्न केले. पावसामुळे गोपीचंद गडावर येण्यासाठी रस्त्याची अडचण असतानाही प्रमुख पाहुणे व गोपीचंद गड शिवारातील शेतकऱ्यांनी या कार्यक्रमास उपस्थिती लावली.

Unlimited Reseller Hosting