Home मराठवाडा बदनापूर नगरपंचायतचे अधिकारी यांचे दोन दिवसाचे वेतन तर कर्मचाऱ्यांच एक दिवसाच वेतन...

बदनापूर नगरपंचायतचे अधिकारी यांचे दोन दिवसाचे वेतन तर कर्मचाऱ्यांच एक दिवसाच वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सुपूर्द…

260

बदनापूर/प्रतिनिधी

कोरोना संकटामुळे राज्यातील आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शासकीय,निमशासकीय कर्मचाऱ्यांना स्वखुशीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये सहभाग घेण्याचे आव्हान केलेले असून या आव्हानाला प्रतिसाद देत बदनापूर नगर पंचायत मुख्य अधिकारी डॉ.पल्लवी अंभोरे यांनी स्वतःचा दोन दिवसाचा वेतन तर अन्य कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये दिले असून सदर रकमेचा धनादेश कर्मचार्यांनी मुख्य अधिकारी डॉ.अंभोरे यांच्याकडे दिला आहे
दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असून आर्थिक स्थिती बिकट झालेली आहे शासनाच्या विविध उपाययोजना सुरु असल्याने आणि राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट बनल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना १९ मुख्यमंत्री सहाय्यता निधी साठी स्वखुशीने एक दिवसाचे वेतन जमा करण्याचे आव्हान शासकीय,निमशासकीय कर्मचाऱ्यांना केल्याने बदनापूर नगर पंचायतच्या वतीने मुख्य अधिकारी डॉ.पल्लवी अंभोरे (दोन दिवसाचे वेतन) ,ज्ञानेश्वर रेवगडे,गणेश ठुबे,गणेश सुरवसे ,भारत पवार,राजेश शर्मा,चंद्रकांत पवार,जालिंदर साबळे,जीवन साबळे,जगन्नाथ गायके,शेख इस्माईल,दीपक दाभाडे व रशीद पठाण यांनी आपले एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता कोष मध्ये जमा करण्यासाठी रकमेचा धनादेश मुख्य अधिकारी डॉ.पल्लवी यांच्याकडे दिला आहे
यावेळी नगर पकनहैट चे सर्व कर्मचारी तसेच अशोक बोकन , हिम्मत कांबळे,लक्ष्मण पवार सय्यद दस्तगीर,तेजराव दाभाडे,आदी उपस्थित होती..