नांदेड

स्वातंत्र्यापासून आजपर्यंत उपेक्षित राहिलेल्या विश्वकर्मा सुतार समाजाला न्याय कधी?

सामाजिक कार्यकर्ता शिवानंद पांचाळ नायगांवकर

नांदेड, दि.११ ( राजेश एन भांगे )
विश्वकर्मा सुतार समाजाने इतिहासा पासून आजपर्यंत देश घडवण्यासाठी मोठे योगदान दिले आहे या देशातील विविध वास्तु प्रसादे कार्यालय मोठ्या बिल्डिंग व अन्य गोष्टी बांधणे व सुशोभित करणे यामध्ये विश्वकर्मा सुतार समाजाचे फार मोठे योगदान आहे तसेच शेतीला लागणारे विविध अवजारे घरातील वस्तू या सुतार समाजाच्या योगदाना शिवाय बनणे अशक्यप्राय होते भारताच्या जडणघडणीत इतका मोठा वाटा सुतार समाजाचा असून देखील राजकीय क्षेत्रात मात्र सुतार समाजाचे फार मोठी उपेक्षा झालेली दिसते सुतार ही जात संविधानाच्या चौकटीत ओबीसी या या वर्गवारीत मोडते परंतु आज महाराष्ट्रात ओबीसी सुतार या जातीचा एकही ही लोकप्रतिनिधी आपणास पाहायला मिळत नाही यामुळे जो सुतार समाज सदैव देश घडविण्यात मग नसतो अशा सुतार समाजाला राजकीय न्याय आजतागायत कोणीही ही दिलेला दिसत नाही यावर्षी भारतीय स्वातंत्र्याला 71 वर्षे पूर्ण होतील परंतु अजूनही सुतार समाजाला राजकीय न्याय मिळालेला नाही किंबहुना तो कुणी दिलेला नाही सुतार या शब्दाचा अर्थ संस्कृत मध्ये पहिला तर व्यवस्थापक असा होतो आणि आशा या उत्कृष्ट व्यवस्थापन कला अवगत असणाऱ्या सुतार समाजातील कोणत्याही व्यक्तीला आजतागायत राजकीय प्रतिनिधित्व न दिले गेल्यामुळे तो देशावरी एक प्रकारचा अन्याय ठरत गेलेला आहे 2012 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या 11 कोटी आहे त्यातील सुतार समाजाच्या विविध संघटनांनी केलेली जनगणना लक्षात घेतली तर महाराष्ट्रातील विश्वकर्मा सुतार हे संख्येने 55 लाखाच्या आसपास आहेत म्हणजेच महाराष्ट्राचे एकूण लोकसंख्येच्या साडेचार टक्के अंदाजही लोकसंख्या भरते महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यात हा समाज विखुरलेला आहे आणि छत्तीस जिल्ह्यात सुतार समाजाचे अस्तित्व मोठ्या प्रमाणात आहे

भारतीय संविधानाचा फायदा घेऊन आज आज अनेक विश्वकर्मा सुतार समाजातील तरुण उच्च शिक्षण घेतलेल्या आहेत विविध क्षेत्रातील सामाजिक योगदान देखील या तरुणांचे मोठे आहे सुतार समाजातील तरुण महाराष्ट्रातील आणि देशातील सर्व जाती आणि धर्मासाठी कायम तेव्हा देत आलेले आहेत त्यांच्यापैकी कित्येक जणांमध्ये उत्तम भाषाशैली वक्तृत्व कर्तुत्व आणि नेतृत्व असे अनेकविध गुण आहेत परंतु इतके असून देखील विश्वकर्मा सुतार जातीतील तरुणांना व व्यक्तिमत्त्वांना राजकीय पटलावर सोईस्कर रित्या डावललेले दिसते या अशा गोष्टींमुळे सुतार समाजातील तरुणांवर राजकीय अन्याय होत आहेत परंतु त्यांच्या कुशल बुद्धिमत्तेचा राजकीय क्षेत्रातील वापर देश हिताकरिता न झाल्यामुळे देशावर आणि राज्यावर एक प्रकारचा अन्याय होत आहे

महाराष्ट्रातील सुमारे 55 लाख विश्वकर्मा सुतार जातीतील नागरिकांना त्यांचा राजकीय न्याय कधी मिळणार की असेच शेकडो वर्षे त्यांना खितपत पडावे लागणार असा न्यूनगंड समाजात निर्माण होत आहे विधानपरिषदेच्या राखीव जागांसाठी अनेक वेळा अनेक समाजसेवी संस्थांनी विश्वकर्मा सुतार समाजातील प्रतिनिधी नेमावा असे निवेदने देऊन व आंदोलने करून ही काही उपयोग होताना दिसत नाही असे जर होत राहिले तर समाजातील तरुण व जनता यांच्यामध्ये जनक्षोभ वाढत जाईल परिणामी यातून राज्याला व देशाला सामाजिक नुकसान होईल

विश्वकर्मा सुतार समाज सर्व राजकीय पक्षांकडे डोळे लावून आशेने पाहत आहे की यावेळी तरी विधान परिषदेवर सुतार समाजातील लोकप्रतिनिधी निवडला जाईल

0 Reviews

Write a Review

Advertisements
Advertisements

You may also like

नांदेड जिल्ह्यातील लोहा उपजिल्हा ग्रामीण शासकीय रुग्णालयास शहीद सैनिक संभाजी कदम यांचे नाव द्या- शंभुसेना

नांदेड – जिल्ह्यातील मौजे जानापुरी येथील भुमीपुत्र शहीद सैनिक संभाजी कदम यांनी नगरोटा, जम्मू काश्मीर ...
नांदेड

मानवाधिकार सुरक्षा संघ (ह्यूमन राईटस) नांदेड जिल्हा अध्यक्षपदी गणपत वानखेडे पाटील व जिल्हा सचिव पदी प्रशांत बारादे , राऊतखेडकर यांची नियुक्ती

नांदेड – मानवाधिकार सुरक्षा संघ (ह्यूमन राईटस) नांदेड जिल्हा अध्यक्षपदी गणपत सदाशिवराव वानखेडे पाटील व ...
नांदेड

किनवटमध्ये आज 5 बाधितांची भर, आता 25 रुग्ण घेताहेत उपचार ; 11 वर्षाचा मुलगा व 13 वर्षाची मुलगी निघाली पॉझिटिव्ह

मजहर शेख नांदेड / किनवट , दि. ०३:- किनवटमध्ये आज सोमवारी ( ता. तिन) सायंकाळी ...

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *