Home विदर्भ आरोग्य विभागातील कोविड १९ चे कर्तव्य बजावणाऱ्या कंत्राटी वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्यांना...

आरोग्य विभागातील कोविड १९ चे कर्तव्य बजावणाऱ्या कंत्राटी वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्यांना शासनाने कायमस्वरूपी करावे – महाराष्ट्र नवनिर्माण सेना

468

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

यवतमाळ सह संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्य विभागात आरबीएसके, आयुष , एनआरएचएम मध्ये कंत्राटी स्वरूपात कार्यरत अनेक कर्मचारी गेली १२/१३ वर्षांपासून तोकड्या मानधनावर ८ तास १० तास काम करीत आहे.

कायम स्वरूपी सेवेत असणाऱ्या एम बी बी एस आरोग्य अधिकाऱ्यांच्या तुलनेत ढोरा सारखी मेहनत करूनही फक्त त्यांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी हे सर्व वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी नाममात्र मानधनावर अश्या महामारीच्या परिस्थितीत आपले कर्तव्य बजावत आहे.वास्तविकतेत संपूर्ण महाराष्ट्रात आज या कंत्राटी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भरवश्यावर आरोग्य विभागाचा कारभार सुरू आहे जे सत्य आहे.या विषयाची गंभीर दखल घेत मनसेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मनसेचे देवा शिवरामवार ,अनिल हमदापुरे यांच्या नेतृत्वात आज निवेदन देण्यात आले.
संपूर्ण महाराष्ट्रात हे चित्र असेच आहे.आरोग्य विभागाने तर कंत्राटी कर्मचाऱ्यांचा विमा सुद्धा काढला नाही, कारण घोषणा होऊन कोणत्याच कर्मचाऱ्यांची माहिती अथवा कागदांची पूर्तता केलेली नाही.महाराष्ट्रातील कंत्राटी स्वरूपात काम करणाऱ्या आरोग्य विभागातील मग ते एन आर एच एम ,राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम , आयुष , विभागाच्या भरवश्यावर एअरपोर्ट स्क्रिनिंग, स्थलांतरित मजुरांची तपासणी,उप जिल्हा रुग्णालय,ग्रामीण रुग्णालय,राज्याच्या सीमावर्ती भागात चेकपोस्ट वर राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम च्या वैद्यकिय अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांच्या ड्युटी लावण्यात आल्या आहेत.काही भागात तर राज्याच्या सीमावर्ती भागात राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम च्या महिला वैद्यकीय अधिकारी रात्री पाळीत आपले कर्तव्य बजावत आहे. वास्तविकतेत शासनाने जो कायमस्वरूपी सेवेत असणारे वैद्यकीय अधिकारी व इतर प्रशिक्षित अधिकाऱ्यांच्या ड्युटी लावणे गरजेचे होते परंतु त्यांना प्रशासनाने देखरेखीच्या कामात ठेवले आहे ही शोकांतिका आहे असे मत मनसेचे अनिल हमदापुरे यांनी या प्रसंगी व्यक्त केले. शासनाने प्रतिबंधित क्षेत्रात प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी नियुक्त करणे गरजेचे होते परंतु त्या ठीकाणी सर्व्हे आणि तपासणीच्या कामासाठी कंत्राटी आर .बी. एस . के. वैद्यकीय अधिकारी यांना कामी लावले आहे जे त्यांच्या जीवावर बेतु शकते त्यांना काम करत असताना कोणत्याच प्रकारची सुरक्षा किट उपलब्ध नसते.शासनाने कोविद १९ च्या कामासाठी कार्यरत सर्व कर्मचारी व अधिकारी यांच्यासाठी पगाराव्यतिरिक्त २०००/- रु ड्युटी प्रमाणे मानधन देण्याची घोषणा केली होती सोबतच ३ महिन्याचे आगाऊ पगार देण्याची घोषणा केली होती,अश्या बऱ्याच गोष्टी आहेत.आज खऱ्या अर्थाने यांचा सन्मान शासनाने करण्याची गरज आहे .यांना खऱ्या अर्थाने पगारवाढ किंवा कायमस्वरूपी सेवेत सामावुन घेण्याची खरी गरज आहे.आज या कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांना फक्त २५ ते ३० हजारात इतर कायमस्वरूपी सेवेत असणाऱ्या कर्मचार्यांन पेक्षा अधिक परिश्रम करूनही नाममात्र पगारात काम करावे लागत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात कोरोंटाइनलासुध्दा पॉझीटीव्ह कोराना रूग्ण ठेवण्यात आले असुन त्या ठिकाणी सुध्दा या कंत्राटी कर्मचारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ड्युट्या लावण्यात आल्या आहेत. दुर्देवाची बाब म्हणजे आपला जीव मुठीत घेऊन कर्तव्य बजावत असतांनासुध्दा या आर.बी.एस.के., आयुष, एन.आर.एच.एम. च्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना आपण कोवीड-19 ची ड्युटी बजावत आहे की नाही याची माहितीसुध्दा प्रशासन त्यांना देत नाही. कारण त्यांना कोवीड-19 च्या कुठल्याच गोष्टींचा लाभ अथवा संरक्षण त्यांना अद्याप झालेला नाही.हे सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी अंगणवाडी ते महाविद्यालयीन तसेच संपूर्ण तळागाळातील जनतेच्या आरोग्यासाठी अविरत झटत असतात
आज आरोग्य विभागातील सर्व कंत्राटी कर्मचारी ह्या सर्व गोष्टींचा विचार न करता फक्त राष्ट्र आणि महाराष्ट्र हितासाठी कार्यरत आहे. अश्या परिस्थिती त्यांचा गांभीर्याने विचार व्हावा आणि सर्व आर बी एस के सहित या कर्तव्यावर कार्यरत वर्षोनुवर्षे सेवा देणाऱ्या कंत्राटी वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांना निदान कायम स्वरूपी सेवेत समावेश व्हावा अथवा समान काम समान वेतन मिळावे एवढी रास्त अपेक्षा अनिल हमदापुरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे निवेदनातून व्यक्त केली.