Home महत्वाची बातमी यवतमाळ जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी यांना काही काळ विश्रांती द्या…!

यवतमाळ जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी यांना काही काळ विश्रांती द्या…!

217

निखिल सायरे यांची जिल्हाधिकारी यांचेकडे आग्रही मागणी…!!

जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा २४ मार्चपासून अविरत कार्यरत…!!!

यवतमाळ – सध्या जगभरात कोरोना या विषाणु ने थैमान घातले आहे. याला आळा घालण्यासाठी संपूर्ण देशभरात २४ मार्चपासून लॉकडाऊन घोषीत करण्यात आले आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा आपला जीव धोक्यात घालून अथक व अविरत काम करत आहे. त्यांनी अनेक कोरोना बाधितांना मृत्युच्या दारातून परत आणले आहे. मात्र या सगळ्यात आरोग्य यंत्रणेची संपूर्ण शक्ती वापरल्या गेल्यामुळे त्यांना आता जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी यांना काही काळ विश्रांतीची नितांत आवश्यकता आहे. तेव्हा जिल्हा प्रशासनाने यावर तातडीने उपाय योजावेत, अशी मागणी निखिल सायरे यांनी आज जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे.

यवतमाळ जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने होणारी वाढ जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या अविरत व अथक परीश्रमाने ब-याच अंशी नियंत्रणात आलेली आहे. मात्र सध्या वातावरणात झालेल्या बदलामुळे भविष्यात कोरोना बाधितांची वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने पुढील काळात अधिक जोमाने काम करण्यासाठी दिनांक २४ मार्च पासून अविरत कार्यरत असलेल्या जिल्ह्यातील आरोग्य कर्मचा-यांना काही कालावधीकरीता विश्रांती द्यावी, अशी आग्रही मागणी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते निखिल सायरे यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे आज दि. ०५ रोजी केली.

“आरोग्य यंत्रणेला विश्रांती हवीच!”: निखिल सायरे

“देशभरात २४ मार्चपासून लागु केलेल्या लॉकडाऊन पासून किंबहुना त्याआधीपासूनच कोरोना विषाणुचा नायनाट करण्यासाठी आरोग्य यंत्रणा आपल्या पूर्ण क्षमतेने अविरत व अथक परिश्रम घेत आहे. याकाळात त्यांना एकाही दिवसाची सुट्टी मिळालेली नाही. या काळात आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून त्यांनी आपली जबाबदारी पार पाडली आहे. मात्र आता त्यांना किमान काही कालावधीकरीता तरी शारीरिक व मानसिक विश्रांतीची गरज निर्माण झाली आहे. तेव्हा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला काही काळ विश्रांती द्यावीच”, असे मत स्थानिक सामाजिक कार्यकर्ते निखिल सायरे यांनी व्यक्त केले.

कोरोना या जीवघेण्या विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य कर्मचारी जीवाचे रान करत आहे. यामुळे त्यांना शारीरिक व मानसिक विश्रांतीची नितांत गरज आहे. प्रशासकीय यंत्रणा आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडत आहेच, मात्र यापुढील दिवसांमध्ये आरोग्य कर्मचारी यांचा क्षमतेच्या वापर पूर्णपणे व्हावा, याकरीता अविरत कार्यरत असलेल्या जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी यांना काही काळ विश्रांती देण्याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, अशी अपेक्षा निखिल सायरे यांनी व्यक्त केली. आता याप्रकरणी आता जिल्हाधिकारी एम. डी. सिंग काय निर्णय घेतात, त्याकडे लक्ष लागले आहे.