Home विदर्भ समाज क्रांती आगाडीचा अनोखा उपक्रम…!

समाज क्रांती आगाडीचा अनोखा उपक्रम…!

333

आरिफ़ पोपटे

वाशिम / कारंजा – दि. 1-6-2020 ला कारंजा तालुक्यातील इंजा या गावा शेजारी पारधी समाजाची मोठी वसाहत आहे. लॉकडाउन मध्ये कामगार, मजूर वर्ग आणि इतरही लोकांचे हाल झाले समाज क्रांती आगाडीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष व त्यांचे सहकारी अनेक गावांमध्ये जाऊन आढावा घेतात आणि गरजू लोकांना किराणा किट देऊन त्यांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करतात. असाच त्यांने इंजा येतील पारधी वसाहत मध्ये जाऊन तेथील माजी सरपंच, म.रा. हिरकणी पुरस्कार प्राप्त सौ सुचित्रा सोळंके व सारंग सोळंके यांच्या मदतीने संपूर्ण गरजू लोकांना किराणा किटचे वाटप केले शासकीय नियम व अटींचे पालन करून हंसराज शेंडे आणि त्यांचे सहकाऱ्यांनी घरोघरी जाऊन वाटप केले यासाठी विजयकुमार वानखडे, हाफिज भाई , दिलीपसिंग भाटिया, राजेंद्र रंगारी, बाबाराव पाटील, गणेश बागडे, भूषण भगत, सत्यशील खिराडे, अतिष सुखदेवे इत्यादीनि परिश्रम घेतले या उपक्रमाचे सर्व स्तरामधून अभिनंदन होत आहे. सगळ्यांनी समाजीक जबाबदारी जोपासावी आणि बाबासाहेबामुळे जे आज सर्वांना वैभव लाभले आहेत आता सामाजिक दायित्व जोपासण्याची व आपले कर्तव्य समाजाप्रती असलेले दायित्व त्याची जबाबदारीची जाणीव असणे ही वेळ आहे असे मत हंसराज शेंडे यांनी व्यक्त केले.