Home नांदेड ना बॅड , ना बारात वधु वर थेट ॠणानू बंधनात..!

ना बॅड , ना बारात वधु वर थेट ॠणानू बंधनात..!

30
0

प्रशांत बारादे

नांदेड – लग्न म्हणाले झगमगाट, बॅड बाजा यासह सर्वकाही जोमात वातावरण पण सध्या परिस्थित कोरोनाच्या संकटामुळे ‘धुमधडाका लग्नाला ब्रेक ‘लागला आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर जगाच्या पाठीवर अनेक बदल झालेले दिसत असतांना आता लग्न सोहळेही अतिशय साध्या पद्धतीने होत आहेत. असे लग्न करणारे कुटुंब हे साध्या पद्धतीने विवाह सोहळे साजरे करुन समाजापुढे निश्चित एक वेगळे आदर्श निर्माण करीत आहेत.
असाच एक लग्न सोहळा कंधार तालुक्यातील बहादरपुरा येथे अतिशय साध्या पद्धतीने पार पडून तो कौतुकाचा विषय ठरला आहे. बहादरपुरा येथील पाडूरंग पेठकर यांचा मुलगा ओमप्रकाश व सतिश बापुराव बारादे यांची कन्या प्रियंका रा.राऊतखेडा हिच्याशी विवाह ठरला. यात विवाहा निश्चित असताना गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर लॉकडाऊन सुरु असल्याने या दोन्ही कुटुंबात समन्वय होऊन लग्न सोहळा मोजक्या घरातील लोकांच्या उपस्थितीत करण्याचे ठरविले गेले आणि रविवारी दि 31 मे रोजी लग्न सोहळा पार पाडण्यात आला हा सोहळा घरातच मोजक्याच लोकांच्या उपस्थितांना संपन्न झाला.
अगदी शिस्तबद्ध आणि प्रशासनाने ठरवून दिलेले सर्व सुरक्षिततेचे नियम पाळून लग्न सोहळा झाल्याने समाजात एक आदर्श निर्माण झाला आला आहे.
या विवाह सोहळ्याला शेकाप चे जेष्ठ नेते भाई गुरुनाथ कुरुडे , शिवसेना नेते मुक्तेश्वर धोंडगे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष सतिश बारादे , राऊतखेडा येथील सरपंच प्रेमानंद गर्जे व पञकार संरक्षण समिती नांदेड दक्षिण विभाग प्रमुख अध्यक्ष प्रशांत बारादे व पञकार बंधु आदींच्या उपस्थितीत हा आदर्श विवाह सोहळा संपन्न झाला.

Unlimited Reseller Hosting