Home विदर्भ शेजारच्या जिल्हयातील शेतक-यांना कापुस विक्रीसाठी आणण्यास आठवडयातुन एक दिवस परवानगी.!

शेजारच्या जिल्हयातील शेतक-यांना कापुस विक्रीसाठी आणण्यास आठवडयातुन एक दिवस परवानगी.!

73
0

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा , दि. २ :- जिल्हयात कलम १४४ लागु करण्यात आले असल्यामुळे वर्धा जिल्हयाच्या हद्दीला लागून असलेल्या शेजारील जिल्हयातील शेतक-यांना जिल्हाबंदी असल्यामुळे मुळे वर्धा जिल्हयात कापूस विक्री करण्यासाठी अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे इतर जिल्हयातील कापूस विक्री करिता जिल्हयात प्रवेश करु देण्यास जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी परवाणगी दिली आहे. आदेश निर्गमित करुन मार्गदर्शक सुचने नुसार शेतक-यांनी कापूस विक्रीस आणावा असे आदेशात नमुद केले आहे.
वर्धा जिल्हयाच्या हद्दीला लागून असलेल्या शेजारील जिल्हयातील काही गावांची कापुस विक्री करीता वर्धा जिल्हा ही पारंपारिक बाजारपेठ आहे. परंतु जिल्हाबंदी लागू करण्यात आली असल्यामुळे या शेतक-यांना कापुस विक्रीकरीता वर्धा जिल्हयामध्ये येण्यास अडथळा निर्माण झाला आहे. या शेतक-याचे नुकसान होऊ नये याकरीता लगतच्या जिल्हयातील शेतक-यांना कापुस विक्री करीता जिल्हयात प्रवेश करु देण्यास परवाणगी देणे आवश्यक असल्यामुळे त्यांना अटी व शर्तीच्या अधीन राहून परवाणगी देण्यात आली आहे.

1. आठवडयातुन 1 दिवस कापुस वाहतुकीची वाहने बाहेरील जिल्हयातून एकाच जिनिंगमध्ये येतील असे नियोजन जिल्हा उपनिबंधक हे करतील. व त्याबाबत पोलिस प्रशासन वर्धा यांना कळवतील जेणे करुन या वाहनांना वर्धा जिल्हयात प्रवेश देणे सोपे होईल.

2. कापुस वाहतुक करणारे वाहन वर्धा जिल्हयात प्रवेश केल्यानंतर ज्या जिनिंगमध्ये जाणार आहे. त्या व्यवस्थापनाने जिनिंगच्या आवारात असे वाहन आल्यानंतर वाहनासोबत आलेल्या व्यक्तीची उतरण्याची व बसण्याची स्वतंत्र व्यवस्था करावी. कोणत्याही परिस्थितीत या व्यक्ती स्थानिकांच्या संपर्कात येणार नाहीत याची काळजी घ्यावीत.

3. जिनिींगच्या आवारात वाहन आल्यानंतर त्याचे निर्जतुकीकरण करावे.

4. खरेदी केंद्रावर नमुद व्यवस्था असल्याची खातरजमा केल्यानंतर दुस-या जिल्हयातील कापुस विक्रीस करणा-या शेतक-यांना कापुस विक्रीकरीता आणण्याची परवाणगी जिल्हा उपनिबंधक देतील.

5. स्थानिक मजुरांच्या सहाय्याने कापुस उतरविण्याची व्यवस्था करावी. कोणत्याही परिस्थितीत बाहेर जिल्हयातुन आलेले मजूर या कामाकरीता वापरता येणार नाहीत.

6. ज्या दिवशी बाहेर जिल्हयातील वाहनाने कापुस सबंधित सुत गिरणीमध्ये येणार असेल त्या दिवशी कृषि विभागाचे कर्मचारी , अधिकारी या सर्व प्रक्रियेवर नियंत्रण व निरिक्षण करण्यासाठी नियंत्रण अधिकारी म्हणुन नियुक्त केले जातील. याबाबतचे नियोजन जिल्हा उपनिबंधक करतील.

7. बाहेर जिल्हयातील कापुस खरेदी करीता निश्चित केलेल्या दिवशी अशा जिनिंगच्या परिसरात वैद्यकिय पथकाची नेमणुक करण्यात येऊन या पथकामार्फत वाहनासोबत आलेल्या व्यक्ती तसेच स्थानिक मजूर या सर्वाची तपासणी करण्यात येईल.
8. कापुस वाहतुकरीता येणारे वाहन कोणत्याही परिस्थितीत 4 तासाच्या आत वर्धा जिल्हयातून बाहेर जाईल याची नियंत्रण अधिकारी म्हणुन नेमणूक केलेल्या कृषि विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांनी दक्षता घ्यावी.
9. संबधीत जिनिंग व्यवस्थापनाने गेटजवळ हँड वॉश सेंटरची उभारणी करावी.

10. संबधितांनी मास्कचा वापर करावा. सोबत पुरेसे सॅनिटायझर ठेवावे.

11. सबंधींतानी आपले मोबाईमध्ये आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करने बंधनकारक राहील. सर्व अटीचा भंग केल्याचे आढळून आल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम, 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144, भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 व इतर संबंधीत कायदे व नियम यांचेअंतर्गत कारवाई करण्यात येईल.

Unlimited Reseller Hosting