सोलापुर

वागदरी येथील रक्तदान शिबीराला उत्तम प्रतिसाद , १०० रक्तदात्यानी केले रक्तदान.

Advertisements
Advertisements

वागदरी – नागप्पा आष्टगी

अक्कलकोट – कोरोना विषाणूचा महामारीमुळे लॉकडाउन सारख्या बिकट परिस्थितीत अनेक रूग्णाना रक्ताची गरज भासते. अशा वेळी वागदरी येथील जागृती फौडेंशन व तरूण मित्र मंडळानी रक्तदान शिबीर भरवुन संकटकाळी मदतीचे हात पुढे केले, खरोखरच अनुकरणीय व स्तुत्य कार्य असल्याचे प्रतिपादन अक्कलकोट तालुक्याचे आमदार सचिन कल्याणशट्टी यांनी केले.

वागदरी येथील जागृती फौडेंशन व तरूण मित्र परिवाराच्या वतीने शिवलिंगेश्वर मंगल कार्यालयात परमेश्वर सावंत यांनी रक्तदान करून कार्यक्रमास सुरूवात झाली. या वेळी माजी जि प सदस्य विजयकुमार ढोपरे, महात्मा गांधी गाव तंटामुक्त अध्यक्ष राजकुमार यादव, ग्रा प सदस्य सुनिल सावंत, उमेश पोमाजी, दत्ता मंगाणे, मंजुनाथ पोमाजी, महादेव पोमाजी, महादेव सोनकावडे, अमर ठोंबरे बळीराम पोमाजी, विनोद घुगरे, प्रशांत मठपती, लक्ष्मीपुत्र यमाजी, शांतु कोठे, श्रीशैल ठोंबरे, प्रदिप पाटील, शिवराज पोमाजी, कमलाकर सोनकांबळे, संतोष पोमाजी , आकाश होनकोरे, प्रकाश पोमाजी, आदी उपस्थित होते. या वेळी पुढे बोलताना आ. कल्याणशट्टी म्हणाले की,
सध्या देशात अनेक गरजू रुग्णांना रक्ताची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत रक्त पुरवणे हे आपले परम कर्तव्य आहे. सर्वांनी मिळून रक्तदान करू या आणि राष्ट्रीय कामात आपले हातभार लावुन, रक्ताचा अनुशेष भरून काढण्याचे आवाहन केले .
यावेळी एकुण १०० रक्तदात्यानी रक्तदान केले. या वेळी नागिनी गणेश शिंदे या एकमेव महिलानी रक्तदान करून आदर्श निर्माण केल्यामुळे आ. कल्याणशट्टी यांचे हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. महादेव पोमाजी यांनी रक्तदान केलेल्या रक्तदात्याचे स्वागत व आभार मानले.

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

विदर्भ

नवयुवक बाल गणेश मंडळ व धनगर समाज संघर्ष समिती तर्फे रक्तदान शिबीराचे आयोजन

मनोज गोरे चंद्रपुर –  दि. 29/08/2020 रोजी राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राष्ट्रहितासाठी सामाजिक ...
सोलापुर

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्र व पुतळ्यासाठी शासनाकडून भरीव मदत करणार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उच्च शिक्षणमंत्री यांच्या हस्ते ऑक्‍टोबरमध्ये भूमिपूजन सोहळा

सोलापूर , दि. 19–  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये अहिल्यादेवींचा अध्यासन केंद्र व अश्वारूढ पुतळ्यासाठी ...
सोलापुर

यशस्वी होण्यासाठी परिश्रम। , जिद्द आणि चिकाटी आवश्यक – डॉ. जयसिद्धेश्वर

आयएएस योगेश कापसे यांचा नागरी सत्कार वागदरी / नागप्पा आष्टगी अक्कलकोटचा भूमिपुत्र योगेश कापसे यांनी ...
सोलापुर

डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांवर अजामीनपत्र गुन्हा आणि दोन लाखापर्यंतचा दंड होणार : आयुष भारत राष्ट्रीय अध्यक्ष – डॉ. आमीर मुलाणी यांची माहिती

सोलापूर प्रतिनिधी डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांवर झालेले हल्ले मुळीच सहन केले जाणार नाहीत. असे प्रकार ...
सोलापुर

आता देशात आयुष भारत पदाधिकाऱ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर मिळणार मानधन

पदाधिकाऱ्यांना मानधन देणारी देशातील पहिली मेडिकल संघटना. सोलापूर – आता देशात आयुष भारत पदाधिकाऱ्यांनी उत्कृष्ट ...
सोलापुर

आयुष भारत नोंदणीकृत सदस्य डॉक्टरांवर कारवाई केली तर गप्प बसणार नाही : आयुष भारत राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.अमीर मुलाणी

आता फक्त मी समजावून सांगतोय ? सोलापूर – अल्टरनेटीव्ह मेडीसिन नॅचरोपॅथी मेडीसिन कम्युनिटी मेडीकल अ‍ॅन्ड ...
सोलापुर

आयुष भारतच्या महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात नियुक्त्या लवकरच होणार –  राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.अमीर मुलाणी

पहिल्या टप्प्यातील आयुष भारतच्या नियुक्त्या पार पडताच दुसऱ्या टप्प्यातील नियुक्त्याची तयारी चालू आहे. सोलापूर – ...