
चंद्रपूर जिल्हा भाजपाचा अभिनव उपक्रम.
कोरपना – मनोज गोरे
चंद्रपुर – राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून माननीय आ सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार तसेच भारतीय जनता पार्टी प्रदेश यांच्या निर्देशानुसार भारतीय जनता पार्टी कोरपना जिल्हा चंद्रपूर च्या वतीने राज इंग्लिश स्कूल कोरपना या ठिकाणी आयोजित करण्यात आले.
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमिवर रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा भासत आहे. हा तुटवडा भरून निघावा या दृष्टीने रक्तदान शिबीराचे आयोजन करून सेवा दिन पाळण्याचे आव्हान करण्यात आले या आव्हानाला प्रतिसाद देत कोरपना तालुक्यातीलअनेक इच्छुक रक्तदात्यांनी शिबिरात सहभागी होऊन रक्तदान केले.
या कार्यक्रमाचे उद्घाटक श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तर अध्यक्ष म्हणून सतीश उपलचीवर शहरध्यक्ष गडचांदूर प्रमुख पाहुणे श्री मनोहर कुडसंगे तालुका महासचिव श्री रमेश पाटील मालेकर किशोरजी बावणे कवडू पाटील जरीले पुरुषोत्तम भोंगळे हरिभाऊ घोरे संदीप शेरकी अरुण डोहे अमोल आसेकर प्रदीप पिंपळशेंडे विजय रणदिवे सरपंच भारत चन्ने, राजेंद्र लोनगाडगे युवा मोर्चा उपाध्यक्ष आदी मान्यवर उपस्थित होते तालुका अध्यक्ष नारायण वरहिवरकर तसेच मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक नारायण हिवरकर यांनी केले संचालन पुरूषोत्तम भोंगळे यांनी केले तर आभार मनोहर कुळसंगे यांनी मानले.










































