Home मराठवाडा दारू विक्रेत्यांनी गहाण ठेवली अक्कल पाण्याच्या जार मध्येच दारू विकण्याची लढविली शक्कल

दारू विक्रेत्यांनी गहाण ठेवली अक्कल पाण्याच्या जार मध्येच दारू विकण्याची लढविली शक्कल

145

लक्ष्मण बिलोरे

जालना – सदर बाजार पोलीस हे कोरोना विषाणू संदर्भाने काद्राबाद चौकी हद्दीत पेट्रोलिंग करत असताना शनिवारी ३० मे रोजी ठीक सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास माहिती मिळाली की, लॉकडाऊन असताना जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करून एकजण पैसे कमावण्याच्या उद्देशाने बिनधास्त पणे गावठी हातभट्टीची दारू पाणी पिण्याच्या जार मध्ये पाणी समजून चोरटी विक्री करीत आहे अशी खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लोधी मोहल्ला जालना येथे पोलिसांनी धाड टाकली असता तेथे काही लोक गर्दी जमून पाणी पिण्याच्या जार मधून ग्लासने दारू पीत असताना दिसले . पोलिसांना पाहताच दारू विक्रेता व दारू पिणारे दारुडे सैरावैरा पळू लागले,तर काहिची पोलिसांना पाहताच नशा उतरली अन् पळून गेले .पोलिसांनी सदर ठिकाणी दोन पंचा समक्ष दारू विक्रेत्याचे नाव विचारले असता तेथे माहिती मिळाली की 1) लखन विजय सिंग राजपूत राहणार लोधी मोहल्ला जालना याचे ताब्यात दोन काळ्या, रंगाच्या प्लास्टिकच्या कॅन व पाणी पिण्याचा थंड जार भरून ज्यात गावठी हातभट्टीची दारू ठेवून ग्लासने लोकांना विक्री करत असताना दिसला व पोलिसांना पाहून पळून गेला पोलिसांनी एकूण *७० लिटर गावठी हातभट्टीच्या दारूच्या कॅन पाण्याचा जार किंमती ४ हजार २०० रुपये असलेल्या मिळून आल्या.पोलिसांनी जागीच पंचनामा करून साहित्य जप्त केले . पळून गेलेल्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश चव्हाण करीत आहे .

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक एस .चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार , उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय देशमुख, पोलीस उपनिरीक्षक योगेश चव्हाण, पोलीस हेडकॉन्स्टेबल परशुराम पवार, पोलीस कॉन्स्टेबल अंबादास दांडगे व कापसे यांनी केली.