
केल्याने होत आहे रे…. आधी केलेच पाहिजे…
यवतमाळ – येथील प्रभाग २५ मधील उज्वल नगर भाग ३ येथे हनुमान मंदिराच्या बाजूला खूप मोठी रिकामी खाली जागा आहे, या ठिकाणी घाणीचे साम्राज्य होते, खूपच खराब परस्थिती होती झाडे झुडपे वाढलेली, दगडधोंडे , काडीकचरा , घाण, झाडाचा पालापाचोळा पडलेला, नगरपरिषदेने कधीही याच्या नगराकडे लक्ष दिले नाही, तसेच मैदान कडे कोणी ढुंकून सुद्धा पाहिले नाही, भारतीय नारी रक्षा संघटनेचे विनोद दोंदल यांनी मैदानात साफसफाई करण्याचे ठरवले काही, मैदान साफसूफ करायचे कोण कोण मदतीला येणार, सफसफाईचे कार्य चालू केले मदतीला घराबाजूलील सचिन राऊत आले एकाचे दोन झाले, कार्य चालू असताना नगरातील लहान लहान चिमुकली मंडळी जमा झाली, झाडे उपटने, पालापाचोळा उचलणे, दगडधोंडे उचलले, झाडझुड करणे, इत्यादी कामात लहान मुलांनी मोलाची कामगिरी बजावली, सम्पूर्ण मैदान साफ करून मुलांना धावण्या साठी रनिंग ट्रॅक बनवले, हे कार्य रोज सकाळी दोन तीन तास, तेरा दिवसात पार पडले, लहान मुलांचे सफसफाईचे कार्य चालू असताना काहीनी फक्त बघ्याची भूमिका बजावली होती मात्र लहान मुले हार मानून थकली नाही,
हे कार्य करण्यासाठी भारतीय नारी रक्षा संघटनेचे विनोद दोंदल, सचिन राऊत, अंकित काबडी, काश्यपी (कुहू) दोंदल, वय ७ वर्ष,दादु राऊत, वय ६ वर्ष,वाहून(शुभ्रू) दोंदल, वय २ वर्ष ६ महिने, स्पुर्वा राऊत, वय ४ वर्ष, तनिष लिचडे, वय ३वर्ष, इत्यादी लहान मंडळींनी खूप परिश्रमाने सफसफाईचे व मैदान बनवण्याचे मोलाचे कार्य पार पडले, हया लहान मुलाच्या कार्यची आजूबाजूच्या परिसरात कौतुक केल्या जात आहे.
लॉकडाऊन काळातही असेही काही कार्य करता येतात, असेच कार्य आपल्या आजूबाजूला करण्याचा संदेश भारतीय नारी रक्षा संघटनेचे विनोद दोंदल यांनी शहरातील जनतेला केला आहे, टाईमपास करण्या पेक्षा वेळेचा सदुपयोग होईल व काहिरती चागले कार्य केले याचे पण समाधान मिळेल,











































