
अंबड – प्रतिनिधी
जालना – कोरोनाच्या साथी दरम्यान प्रत्येक जण आपल्या आरोग्याच्या बाबतीत जागरूक झालेल्या आहे ;परंतु समाजात असेही काही लोक आहेत ज्यांना कामावर गेलो नाही तर खायला भेटणार नाही त्यामुळे साहजिकच त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते; हिच बाब हेरून अंबड तालुक्यातील वडीकाळ्या येथील सामाजिक कार्यकर्ते रमेश काळे व गणेश नरवडे,डॉ.रामेश्वर पाटील यांनी रोहयो अंतर्गत कामावर असलेल्या मजुरांची थेट बांधावर जाऊन च आरोग्यतपासणी व औषधी वाटप शिबिराचे आयोजन केले.
या शिबिरात जवळपास 250 मजुरांची आरोग्यतपासणी करण्यात आली व त्यांना रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयाने सुचवलेले आर्सेनिक अल्बम30 या होमियोपॅथीक औषधीचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी गावचे सरपंच रामेश्वर काळे, उपसरपंच भगवान ढेबे, ग्रामसेवक वाबळे साहेब,रमेश काळे गणेश नरवडे,ग्रामपंचायत ऑपरेटर वाल्मिक मते, जितेंद्र रक्ताटे,रामेश्वर खरात इत्यादि उपस्थित होते.











































