Home मराठवाडा शेतकऱ्यांना मध्यवर्ती बँकेतून अनुदान न मिळण्यामागचे काय आहे गौडबंगाल…?

शेतकऱ्यांना मध्यवर्ती बँकेतून अनुदान न मिळण्यामागचे काय आहे गौडबंगाल…?

85

लक्ष्मण बिलोरे

जालना – जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेतून शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान योजनेचे अनुदान न मिळण्यामागचे काय गौडबंगाल आहे ? याबाबतच्या संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून सोशल मीडियावर उमटत आहेत.या योजनेचा लाभ मिळण्यापासून वंचित असलेले शेतकरी जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक, बँक अधिकाऱ्यांवर आरोप करत आहेत कि, बँकांमध्ये शेतकऱ्यांचा पैसा पडून असूनही वाटप केला जात नाही.महसुल कर्मचाऱ्यांच्या चूकिमुळे शेतकऱ्यांचा पैसा हातात पडत नाही , घनसावंगी तालुक्यातील सातशे ते एक हजार लोकांचे अनुदान सहा ते सात महिन्यांपासून अडगळीत पडलेले आहे.शेतकरी बोलत आहेत कि आॅनलाईन चेक केल्यास पैसे जमा झालेले दिसतात, परंतु बँक अधिकारी पैसे जमा झाले नाहीत म्हणून सांगतात. कुणाचे आठ हजार ,सहा हजार,कुणाचे चार हजार, दोन हजार ‌.‌.अशा वेगवेगळ्या रकमा सहा ते सात महिन्यांपासून लाखों रूपयांचे शेतकऱ्यांचे अनुदान बँकेच्या हेड आॅफिसमध्ये पडून आहे.आणि या पैशातून येणारे व्याज हडप केले जात आहे.पंतप्रधान किसान योजनेचे अनुदान मिळावे यासाठी शेतकरी बँकेच्या पायऱ्या झिजवत आहेत परंतु चतुर बँक अधिकारी, आणि महसूल कर्मचारी भोळ्याभाबड्या शेतकऱ्यांना चेंडू सारखे टोलवाटोलवी करत आहेत.घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांनी जालना जिल्हाधिकारी कार्यालयात वेळोवेळी तक्रारी केल्या परंतु दखल घेतली जात नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. पंतप्रधान किसान योजनेच्या शेतकऱ्यांच्या अनुदानात निश्चित अफरातफर झाली असावी , याबाबत चौकशी करण्यात यावी अशी शेतकऱ्यांची मागणी सोशल मीडियावर जोर धरत आहे.