Home मराठवाडा ट्रक अपघातात एक ठार तर एक गंभीर , “आठ शेळ्यांनाही चिरडले”

ट्रक अपघातात एक ठार तर एक गंभीर , “आठ शेळ्यांनाही चिरडले”

24
0

मजहर शेख

किनवट / नांदेड , दि. २४ :- मांडवी कडून उमरी ( बाजार) कडे जाणाऱ्या दुचाकीला पाठीमागुन ट्रक ने धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे त्याबरोबरच रस्त्याचा कडेला चरणाऱ्या आठ मेंढ्याही चिरडून गेल्या. ही घटना शनिवारी सायंकाळी सहा वाजता मांडवी येथे घडली ट्रक चालकास अटक करून ट्रक जप्त करण्यात आला आहे.
मांडवी कडून आपले काम आटोपून जगन रोहिदास पवार (वय 24 वर्षे) व भिमराव घुटटी चव्हाण (वय 60 वर्षे ) दोघे रा गौरी हे मोटारसायकल क्रमांक एम. एच. 26 पी.9395 ने उमरी बाजार येत असताना मांडवी जवळील पुलाजवळ ट्रक क्रमांक एम. एच. 34 बीजी 3132 चे चालक नानापुरी गोसावी रा. लिंगाकोत रिसोड जि वाशिम हा
दारू पिऊन निष्काळजीपणे भरधाव वेगाने ट्रक चालवत असताना समोरील मोटारसायकला पाठीमागुन धडक दिल्याने मोटारसायकल चालक जगन रोहिदास पवार हा जागीच ठार झाला. पाठीमागे बसलेला भीमराव गंभीर जखमी झाला असुन रस्त्याचा कडेला चरणाऱ्या आठ मेंढ्या चिरडून मेले.यात मेंढपाळाचे अंदाजे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मेंढपाळ लखन उंकडराव मडावी रा. फुले नगर ता. किनवट यांनी दिलेल्या फिर्यादी वरून ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल करून चालक आरोपीस मांडवी पोलिसांनी ताब्यात घेतले असुन दहा लाख किंमतीचा ट्रक जप्त करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सपोनि संतोष केंद्रे, पोलिस उपनिरीक्षक शिवप्रसाद कराळे, पो.काॅ. नामदेव अस्वले हे करीत आहेत.

Unlimited Reseller Hosting