
प्रसारमाध्यमे व सोशल मिडियाच्या माध्यमांतुन नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे. पण अनेक लोक याकडे अजुनही गांभीर्याने पाहत नाहीत.
ठाणे – राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सारा फाऊंडेशन ठाणे च्या वतीने कोरोना जनजागृती अभियान सुरु करण्यात आले आहे. शासन पातळीवर प्रयत्न होत असले तरीही जोवर नागरिकांमध्ये जागृती होत नाही तोपर्यंत या आजाराला रोखणे कठीण आहे. त्यामुळे रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना सारा फाऊंडेशन घरी बसण्याचे आवाहन करत आहे. सोबतच आपण आपली काळजी कशी घ्यावी ? आजाराची लक्षणे काय आहेत याचीही माहिती नागरिकांना दिली जात असल्याचे सारा फाऊंडेशन च्या संस्थापक अध्यक्षा सारंगी महाजन यांनी सांगितले.
प्रसारमाध्यमे व सोशल मिडियाच्या माध्यमांतुन नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे. पण अनेक लोक याकडे अजुनही गांभीर्याने पाहत नाहीत. रस्त्यावर अश्या प्रकारच्या जनजागृतीमुळे नागरिकांमध्ये जागृती होत आहे.टिव्हीवरची जागृती ते आम्ही करत असलेली सारा फाऊंडेशन च्या तर्फे होत असलेली जागृती व इतर सर्वच स्तरातुन होत असलेल्या जनजागृतीमुळे लोक गांभीर्याने विचार करुन योग्य ती काळजी घेत आहेत असल्याचे सारंगी महाजन यांनी सांगितले.
जालना जिल्यात अनेक ठिकाणी मास्क व इतर गरजू लोकांना साहित्य वाटप –
गरजू कुटुंबांना दहा ते पंधरा दिवस पुरेल एवढया जीवनावश्यक साहित्याचे वाटप केले. जीवनावश्यक साहित्याचे घरोघरी जाऊन या साहित्याचे वाटप केले. तसेच कोरोनाच्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क, स्वच्छता बाळगण्याचे तसेच प्रत्येक व्यक्तीने होम क्वारंटाईनमध्ये राहण्याचे आवाहन केले. सारा फाऊंडेशन च्या वतीने दिलेल्या जीवनावश्यक साहित्यामुळे 80कुटुंबातील सदस्यांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान सारा फाऊंडेशन तर्फे राबविलेला या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून या उपक्रमातून प्रेरणा घेऊन समाजातील अनेक घटक मदतीसाठी पुढे येऊ लागले आहेत.या बाबत विशेष बाब म्हणजे सारा फाऊंडेशन च्या सदस्यांनी हे साहित्य वाटप करताना त्या गरजू लोकांचा फोटो न काढता त्यांना साहित्य वाटप केले.सारा फाऊंडेशन प्रमाणेच इतरांनी सुद्धा मदत वाटप करताना कोणाचे फोटो काढून त्याचा अपमान करू नये अश्या भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.










































