मुंबई

राज्यात पुन्हा कारखाने सुरू करण्यासाठी आपल्या गावी (खेड्यात ) गेलेल्या कामगारांना परत आणण्यासाठी धोरण आखण्याचा शरद पवारांचा सल्ला

Advertisements
Advertisements

विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे

मुंबई , दि. २३ :- देशभरात कोरोनाचा (Coronavirus) कहर वाढत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून देशात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे मोठ्या संख्येने मजूर, कामगार आपआपल्या गावी परतले आहेत. मात्र यामुळे राज्यात विविध कंपन्यांना कामे करणे अवघड जात आहे.

याबाबत केंद्रीय मंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांनी लॉकडाऊननंतर आर्थिक संकट सोडविण्यासाठी धोरणात्मक उपाययोजना करण्याचे आवश्यक असल्याचे सांगितलं आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.

त्यामध्ये ते म्हणतात, राज्य सरकार लॉकडाऊनची परिस्थिती शिथिल करीत आहेत. पण मजूर, कामगार खेड्यांमध्ये स्थलांतरित झाल्याने कारखाने पुन्हा सुरू करण्याच्या स्थितीत नाहीत आहेत. आपणाला त्यांना परत आणण्यासाठी धोरण राबवणे आवश्यक आहे.

The state governments are relaxing the conditions of lockdown but factories are not in a position to resume as workers have migrated to the villages. We need to strategize to bring them back.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 22, 2020

New policies for encouraging industrial growth should be incorporated to attract new investment in the states. To increase imports, exports and inland shipping, consultations should be held with industrialists, entrepreneurs and expert officials in the field.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 22, 2020

दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, राज्यांमध्ये नवीन गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी औद्योगिक विकासाला प्रोत्साहित करण्यासाठी नवीन धोरणांचा समावेश केला पाहिजे. आयात, निर्यात आणि अंतर्देशीय शिपिंग वाढविण्यासाठी उद्योगपती, उद्योजक आणि क्षेत्रातील तज्ज्ञ अधिकाऱ्यांशी सल्ला मसलत करण्याची गरज आहे.

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

मराठवाडा

रघुनाथ मुकने यांच्या प्रयत्नातून मुरमा गावात मजुरांना जाॅबकार्ड वितरण

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे जालना जिल्हा घनसावंगी तालुक्यातील मुरमा खुर्द येथे रोजगार हमी योजना अंतर्गत ...
मुंबई

मराठा समाजाला आरक्षण मिळावे त्यांचा संविधानिक हक्क होय, आरपीआय डेमोक्रॅटिक मैदानात – पँथर डॉ राजन माकणीकर

मुंबई –  (प्रतिनिधी) मराठा आरक्षण हा मराठा समाजाचा संविधानिक हक्क असून आरपीआय डेमोक्रॅटिक पक्ष पूर्ण ...
मुंबई

ऍड. बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली रिपाई चे सर्व गट एकत्र व्हावेत – आरपीआय डेमोक्रॅटिक पक्ष

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया मुंबई , दि. १७ – (प्रतिनिधी) देशासह राज्यात सवर्णांकडून वंचित समूहावर होत ...
मुंबई

अन्याय विरुद्ध लढण्याची धमक भिम आर्मी मध्येच , नेहाताई शिंदे यांचे प्रतिपादन तर दलित , मुस्लिम ओबीसी नी एकत्र यावे – दीपक हनवते चे आव्हान

मुंबई – प्रतिनिधी  देशात सत्ता कुठल्याही पक्षाची असली तरी रोज कुठे ना कुठे दलितांची कुचंबणा ...