Home मराठवाडा बिलोलीत डॉक्टर ,पोलीस , आर.टी.ओ पञकार यांना कोरोना सेप्टी फेस चिल्डचे वाटप

बिलोलीत डॉक्टर ,पोलीस , आर.टी.ओ पञकार यांना कोरोना सेप्टी फेस चिल्डचे वाटप

14
0

नांदेड / बिलोली ( ता.प्र ) – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोकण्यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेस बिलोली तालूक्याच्या वतीने बिलोलीत डॉक्टर ,पोलीस, आर.टी.ओ पञकार यांना कोरोना सेप्टी फेस चिल्डचे आज दि.21 मे रोजी वाटप करण्यात आले.

दिवसेंदिवस कोविड-19हा आजार वाढत येत असल्याचे लक्षात घेवून राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाने बिलोली ग्रामीण रुग्णालय बिलोली ,पोलीस ठाणे,प्राधमिक आरोग्य केंद्र लोहगाव,परिवहन अधिकारी कार्ला व बिलोली तालूक्यातील पञकार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतिने वाटप करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष नागनाथराव पाटील सावळीकर,सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष गंगाधराव प्रचंड,माजी.न.प उपाध्यक्ष अनुप अंकुशकर युवा अध्यक्ष रनजीत पाटील हिवराळे,शहर अध्यक्ष अर्जून अंकुशकर,सय्यद महेबुब,माधव वाघमारे, पञकार राजु पाटील शिंपाळकर, सय्यद रियाज,व मिडीया ब्यूरोचीफ संजयकुमार बिलोलीकर ,अदी जन उपस्थित होते.