Home महत्वाची बातमी 12 वर्षीय अल्पवयीन मुलीचा गळा चिरून निर्दयीपणे हत्या ,

12 वर्षीय अल्पवयीन मुलीचा गळा चिरून निर्दयीपणे हत्या ,

33
0

सर्वत्र उडाली खळबळ ,

शिरीहरी अंभोरे पाटील ,

हिंगोली तालुक्यातील नांदुसा येथे एका बारा वर्षीय मुलीचा गळा चिरून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी (दि.21) दुपारी एकच्या सुमारास घडली. प्रियंका शिवाजी कांबळे असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. ती गावातील जिल्हा परिषदे शाळेत इयत्ता सहावीत शिकत होती. हिंगोली तालुक्यातील नांदुसा येथील शिवाजी कांबळे यांना दोन मुली व दोन मुले आहेत. आज कांबळे कुटुंब शेतात काम करण्यासाठी गेले होते. तर घरी प्रियंका कांबळे (वय -12) आणि आशिष कांबळे (वय-4) हे दोघेजण घरीच होते.

परंतु या दरम्यान आशिष हा घराबाहेर खेळत असताना एका अज्ञात आरोपीने घरात प्रवेश करून प्रियंकाचा गळा चिरून खून केला. त्यानंतर मयत प्रियंकाची मोठी बहिण ही घरी आली. यावेळी प्रियंकाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहताच तिने हंबरडा फोडला. तिने शेतात जाऊन याबाबत आई वडिलांना माहिती दिली. काही वेळातच शिवाजी कांबळे व त्यांच्या पत्नी घरी आले.
प्रियंकाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पाहताच आई व वडिलांनी एकच आक्रोश केला. परंतु हा खून कोणी व कोणत्या करणातून केला हे मात्र कळू शकले नाही. मयत प्रियंकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी हिंगोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात आणले. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक रामेश्वर वैंजणे, सहायक पोलीस निरीक्षक राजेश मलपिलू आणि पोलीस कर्मचारी दाखल झाले. घटनास्थळी पोलिसांना ब्लेड आढळून आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Unlimited Reseller Hosting