August 5, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

नांदेड डाक विभागाची लोक डाउन मध्ये जवळपास शंभर करोड रुपयांची उलाढाल – डाक अधिक्षक नांदेड

नांदेड , दि.२० :- कोरोनाच्या महामारीत नांदेड डाक विभागाने गोरगरीब जनतेच्या दारात जाऊन जिल्यात जवळपास शंभर करोड रुपायाचे केली उलाढाल असे डाक अधीक्षक श्री. शिवशंकर बी लिंगायत यांनी आज नांदेड आकाशवाणी केंद्राला दिलेल्या मुलाखतीत माहिती दिली.
डाक अधिक्षक नांदेड यांनी असे म्हणाले की नांदेड जिल्ह्यात ग्रामीण भागातील चारशे,आठरा ब्रँच पोस्ट ऑफिस व एकावन्न सब पोस्ट ऑफिस आणि एक मुख्य पोस्ट ऑफिस आहेत.जवळपास पंधराशे खेडे,वाड्या तांड्यात आहेत.यांना कोरोनाच्या महामारीत आर्थिक त्रास होऊ नये. म्हणून प्रत्येक नागरिकाच्या दारात पोस्ट बँकेच्या Aeps प्रणाली द्वारे दोन करोड रुपयांचे कोणत्याही बँक खात्यातील पैसे पोस्टमन मार्फत घरोघरी जाऊन Aeps द्वारे वाटप केले तर निराधार,अपंग,अंध,जेष्ठ नागरिक, किसान सन्मान योजना, गरीब कल्याण योजना जनधन, गरोदर माता आहार भता,गैस सबसिडी पाच करोड रुपयांचे पोस्ट बँकेच्या मायक्रो ATM द्वारे वाटप ग्रामीण भागात करण्यात आले आहे.

बातमीपत्र – सुरेश सिंगेवार [ विपणन कार्यकारी अधिकारी मुख्य पोस्ट ऑफिस नांदेड.]

■ आणि नांदेड मुख्य पोस्ट ऑफिस व सब पोस्ट ऑफिस मधून जमा व वाटप सर्व पोस्ट व्यवहाराचे नव्वद करोड रुपयांचे वाटप करण्यात आले असल्याचे सांगितले आहे.
विशेष करून हे सर्व व्यवहार डिजीटल व्यवहार करण्यात आले आणि सर्व शासकीय नियमाचे तंतोतंत पालन करण्यात आले असल्याचे ही सांगितले.
तसेच नांदेडचे मुख्य पोस्ट मास्तर श्री.डी.एम.जाधव यांनी आपल्या नांदेड आकाशवाणी केंद्राच्या मुलाखतीत बोलताना म्हणाले की नांदेड शहरातील नागरिकांना पैशाची अडचणी निर्माण होऊ नये म्हणून दररोज मुख्य पोस्ट ऑफिस मधील दहा पोस्टमन व एक स्पशेल काउंटर द्वारे पैशाची देवाणघेवाण सुरू आहे.आणि इतवारा, सिडको,शिवाजी नगर,मिल गेट,अशोक नगर,तरोडा नाका, नांदेड टाऊन,सचखड,चैतन्य नगर, विध्यापिठ या पोस्ट ऑफिस मधून दररोज विविध प्रकारच्या योजनांचे पैसे वाटप व Aeps प्रणाली द्वारे दररोज पाचशे ते सहाशे नागरिकांना पैसे वाटप या कोरोनाच्या संकटकाळी करण्यात येत आहे.
सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षासाठी व नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून प्रत्येक कर्मचाऱ्यांना मास्क, हॅन्ड कोलोज,हँड वॉश, देण्यात आले आहे. तसेच सोशल डिस्टससिग अंतर ठेऊन शासनाने दिलेल्या नियमा पालन करण्यात येत असल्याचे आपल्या मुलाखती सांगितले आहे.

तर नांदेडचे डाक विकास अधिकारी श्री.सुरेश वाघमारे यांनी आज नांदेड

आकाशवाणी केंद्रावर मुलाखत देताना म्हणाले की लॉक डाउन मध्ये डाक जीव विमा चे काम आम्ही उत्कृष्ट पणे पार पाडत आहोत नागरिकांना त्याच्या वेळे वर आम्ही या दोन महिन्यांत एकेचालीस डाक जीवन विमा ग्रहांकाना मुदत संपल्याने तिरुपन्न लाख,सत्तर हजार, चारशे,सोळा रुपयांचे धनादेश मुदत संपलेल्या डाक जीवन विमा ग्रहाकाच्या बचत खात्यात पैसे जमा केले आहे. तर तेरा लाख,बत्तीस हजार, डाक जीवन विमा धारकाला लोण मंजूर करून पैसे देण्यात आले असल्याचे सांगितले आहे.
हे सर्व व्यवहार डिजीटल डाक प्रणाली द्वारे करण्यात आले आहे.
आपल्या मुलाखतीत माहिती दिली आहे.

Advertisements

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!