Home विदर्भ टाळेबंदीचा सदुपयोग गावाच्या स्वच्छतेसाठी तरोडातील युवकांचा उपक्रम….!

टाळेबंदीचा सदुपयोग गावाच्या स्वच्छतेसाठी तरोडातील युवकांचा उपक्रम….!

108

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

यवतमाळ , दि. १३ :- कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आर्णी तालुक्यातील तरोडा गावातील युवकांनी ‘छत्रपती शिवराय प्रतिष्ठान’च्या माध्यमातून सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत सामाजिक उपक्रम राबविले. तरूणांनी टाळेबंदीचा सदुपयोग गावाच्या स्वच्छतेसाठी करून नवा आदर्श निर्माण केला आहे.

सामाजिक बांधिलकी जपत छत्रपति शिवराय प्रतिष्ठाणच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण गावातील परिसर, ग्रामपंचायत, बस स्थानक, जिल्हा परिषद शाळा, देवस्थान, अंगणवाडी, गावातील गल्ली बोळा, सार्वजनिक ठिकाणांवर निर्जंतुकीकरण औषधाची फवारणी करून स्वच्छता केली. गावात प्रवेश करताना प्रत्येक नागरिकाचे न चुकता ‘सॅनिटायझेशन’ करण्यावर कटाक्षाने भर देऊन त्यांना गावात प्रवेश देण्यात येतो. गावातील नाल्यातील गाळाचा उपसा करून गावातील रस्त्याची स्वच्छता, काटेरी झुडुपांची विल्लेवाट लावण्यात आली. या कार्यामुळे गावाची वेगळीच ओळख निर्माण झाली. गेल्यावर्षी १ मे रोजी गडचिरोली येथे नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात तरोडा गावातील जवान आग्रमन बक्षी शहीद झाले होते. त्यांच्या समाधीस्थळाची स्वच्छता करून शहीददिनानिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहून गावाच्या विकासकार्यात नेहमीच अग्रेसर राहण्याची शपथ तरूणांनी घेतली.