Home मराठवाडा नांदेडच्या बारड येथे आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला, नांदेडची रुग्ण एकूण...

नांदेडच्या बारड येथे आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला, नांदेडची रुग्ण एकूण संख्या ५३ तर ५ मृत्यू

28
0

राजेश भांगे

नांदेड – मुंबई येथून बारडला परतलेल्या एका कुटुंबातील २२ वर्षाच्या तरुणाचा अहवाल आज पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात आले.हे कुटुंब बारड कडे येण्यासाठी मुंबईहुन पायी निघाले होते.त्यामध्ये महिला व लहान मुलांचा समावेश होता. मंठा येथून एक वाहन मिळाल्या नंतर हे सर्व जण दोन दिवसांपूर्वी बारडला पोहचले होते.यानंतर त्यांना
क्वांरटाईन करून त्यांचे स्वॅब घेण्यात आले होते.त्यामध्ये एक जण कोरोना बाधित असल्याचे आढळून आले.यामुळे माहूर नंतर आता बारड मध्येही कोरोनाचा शिरकाव झाला आहे.यामुळे आजपर्यंत कोरोना मुक्त असलेल्या बारड मध्ये खळबळ उडाली आहे.
दरम्यान मुंबई येथून निघताना यांची कुठेही तपासणी झाली नाही असेच दिसून येते. हे कुटुंब मुंबईत कामासाठी गेले होते.
आज आज प्राप्त 24 अहवाला नुसार, ग्रामीण रुग्णालय बारड धर्मशाळा वीर केअर सेंटर ता. मुखेड एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला आहे. तसेच ते वीस अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.. सध्यास्थितीत नांदेड चे एकूण रुग्ण संख्या 53 असून 5 जणांचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक नीळकंठ भोसीकर यांनी माहिती दिली आहे.

Unlimited Reseller Hosting