Home विदर्भ वर्धा जिल्हा प्रशासनाने आरोग्य यंत्रणेसह कंटेन्मेंट प्लॅनच्या कामकाजाला सुरूवात…!

वर्धा जिल्हा प्रशासनाने आरोग्य यंत्रणेसह कंटेन्मेंट प्लॅनच्या कामकाजाला सुरूवात…!

93

इक़बाल शेख / रवि साखरे

हिवरा तांडा गावासह लगतच्या गावातील वाहतूक थांबवण्यात आली…

मुत्यक महिलेच्या संंपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेणे सुरू….

वर्धा – जिल्ह्यातील आर्वी तालुक्याच्या हिवरा तांडा येथील एका महिलेच्या मृत्यूनंतर चाचणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले असल्याचे सांगितले जात आहे. ८ मे रोजी या महिलेचा मृत्यू झाला होता. या महिलेला दम्याच्या त्रास झाल्याने तिला खासगी रुगणालयात नेण्यात आले. त्यानंतर तिला उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक पुरुषोत्तम मडावी यांनी दिली. या नंतर जिल्हा प्रशासनाने आरोग्य यंत्रणेसह कंटेन्मेंट प्लॅनच्या कामकाजाला सुरूवात केली आहे. हिवरा तांडा गावासह लगतच्या गावातील वाहतूक थांबवण्यात आली आहे. या महिलेच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना शोधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.तर दुसरीकडे जिल्ह्या प्रशासनाकडून खबरदारी बाळगत उद्या पासून दोन दिवसाठी संपूर्ण जिल्ह्यात लाॅकडाऊन घोषित करण्यात आले आहे…