Home विदर्भ शेतकऱ्यांना तात्काळ पिक कर्ज द्यावे – विजय बावणे

शेतकऱ्यांना तात्काळ पिक कर्ज द्यावे – विजय बावणे

157

कोरपना प्रतिनिधी – मनोज गोरे

चंद्रपुर – शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहेत शेतकरी आपली सर्व पुंजी शेतात घालतो मनोज शेतकऱ्यांच्या शेतातील मशागतीची कामे झाले आहेत आणि आज शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बँकांनी शेतकऱ्यांना तात्काळ शेती आवश्यक खाते बी बियाणे खरेदी करण्यासाठी पीक कर्ज मंजूर करण्यात यावे यासाठी जिल्हाधिकारी यांनी विशेष लक्ष केंद्रित करून बँकांनी तातडीने पीक कर्ज मंजूर करण्यासाठी आदेश देण्यात यावे शेतकरी खूप मोठ्या संकटात आले आहे आणि शेतकरी हा संपूर्ण जगाचा पोशिंदा आहे शेतकरी जगला तर देश जगेल त्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही बँकेच्या अधिकारी यांना अडवणूक करू नयेत शेतकऱ्यांना योग्य वेळी पीक मिळाले तर शेतकरी खते बी-बियाणे आणि शेती आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना पैसे उपलब्ध होतील शेतकरी बांधवांना तात्काळ पिक कर्ज बँकेने उपलब्ध करून द्यावे असे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विजयराव बावणे यांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे मागणी केली आहे तेव्हा तात्काळ शेतकऱ्यांना कर्ज देऊन शेतकऱ्याकडे लक्ष देण्याचे मागणी केली आहेत.