Home जळगाव पाचोरा येथे १० ते १७ पर्यंत जनता कर्फ्यू – आमदार किशोर पाटील

पाचोरा येथे १० ते १७ पर्यंत जनता कर्फ्यू – आमदार किशोर पाटील

50
0

यामध्ये फक्त मेडिकल व दुध हेच सुरू राहणार

निखिल मोर

पाचोरा – पाचोरा येथे कोरोना विषाणूचे ढग गडद होत असून गुरुवारी जे अहवाल प्राप्त झाले त्यात ६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. शहरात कोरोना पॉझिटिव्ह ची संख्या एकूण १५ झाली आहे. त्यात पाचोरा येथील एक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा ही समावेश असल्याने यंत्रणा अक्षरशः हादरली आहे ही बाब गांभीर्याने घेऊन आमदार किशोर पाटील यांनी शुक्रवारी सकाळी पोलीस ,महसूल व पालिका अधिकारी व नंतर आरोग्य अधिकारी यांच्या स्वतंत्र बैठका घेऊन झूम ॲप द्वारे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. सर्व व पक्ष प्रमूखांशी बोलणे करून १०ते १७ मे पर्यंत जनता कर्फ्यू पाळण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आल्याचे आमदार किशोर पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले .तसेच पत्रकारांनी उपस्थित केलेल्या विविध सूचनां संदर्भात त्वरित निर्णय घेऊन कार्यवाही करण्याचे आश्वासित केले. 7 दिवसांच्या या जनता कर्फ्युस सर्वांनी सहकार्य करून घट्ट होत असलेली साखळी तोडावी असे आवाहनही केले.जनता कर्फ्यू काळात रूग्णालयाशी संलग्न मेडिकल व दूध डेअरी याव्यतिरिक्त इतर सर्व दुकाने ,कृउबा समीती व भाजीपाला बंद राहील. दूध विक्री सकाळी 7 ते 10 व सायंकाळी 5 ते 8 या वेळेतच होईल. अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडताना मास्क व सॅनीटायझरचा वापर करावा. अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांनी देखील फिजिकल डिस्टनसिंगचे नियम पाळावे, आपण सुरक्षित राहिलो म्हणजे समाज, राष्ट्र व देश सुरक्षित राहील म्हणून आपणच आपले रक्षक व्हा आणि कोरोनाला हरवा असे आवाहन आमदार किशोर पाटील यांनी व्हीसी द्वारे पत्रकार परिषदेत केले.

Unlimited Reseller Hosting