Home विदर्भ भारतीय नारी रक्षा संघटनेच्या सदस्यांची जपले रक्ताचे नाते

भारतीय नारी रक्षा संघटनेच्या सदस्यांची जपले रक्ताचे नाते

277

वंजारी दाम्पत्य गेले वृध्द महिलेच्या मदतीला

यवतमाळ – दि.७ मे रोजी संपुर्ण जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणीक तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त भारतीय नारी रक्षा संघटनाच्या वतिने मास्कचे वाटप करत असतांना संघटनेचे सुकांत वंजारी यांना एक अज्ञात व्यक्तिचा फोन आला कि आईच्या पायाची शस्त्रक्रिया करायची आहे.यासाठी डाॅक्टरांनी तातडीने चार बाॅटल रक्ताची गरज आहे मला तुमचा नंबर विर नायक या साप्ताहिकाचे मुख्य संपादक राजु गायकवाड असे त्यांनी सांगितले.पण दोन्ही त्या व्यक्तीशी कुठलाही परिचय नाही पण त्या वृध्द आईला रक्ताची गरज आहे हे महत्वाचे असुन त्यांना भारतीय नारी रक्षा संघटनेचे सदस्य सुकांत वंजारी व अरुणा सुकांत वंजारी हे त्यांच्यासाठी रक्तदान करण्यासाठी गेले.

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे जवळ असलेल्या छोट्याशा खेड्यात सावित्रीबाई वासुदेवराव ढंगारे रा. कावली (वसाड) ह्या उपचारासाठी यवतमाळ येथील स्व.वसंतराव नाईक वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल असल्याची माहिती त्यांनी दिली. यवतमाळात कुणीही परिचयाचे नसल्याने रक्ताची मदत कुणाला मागावी हा प्रश्न रुग्ण महिलेच्या मुलाला पडला होता. तसेच यवतमाळात कोरोणा बाधितांची वाढती संख्या पाहता शासकिय रुग्णालयाचे नाव काढले तरि अंगावर शहारे येतात अशी परिस्थिती असतांना सर्वत्र लाॅकडाऊन असल्याने कुणीही रक्तदान करण्यासाठी येणार कि नाही अशी भिती त्यांना होती मात्र समाजसेवेचा व मुलीं व महिलांच्या रक्षणार्थ सदैव तत्पर असलेले भारतीय नारी रक्षा संघटने सदस्य सुकांत प्रकाश वंजारी व अरुणा सुकांत वंजारी हे त्या वृध्द मातेच्या मदतीसाठी धावुन गेले व दोघांनाही कशाची ही भिती न बाळगता त्यांना रक्तदान केले तसेच तुम्ही बाहेरगावचे असल्याने काही अडचन आल्यास आणखी काही मदत हवी असल्यास भारतीय नारी रक्षा आपल्या सेवेत सदैव तत्पर राहील असे सांगितले.