Home मराठवाडा धक्कादायक – नांदेड मध्ये आढळले आणखी तीन कोविड १९ पोझेटिव्ह रूग्ण

धक्कादायक – नांदेड मध्ये आढळले आणखी तीन कोविड १९ पोझेटिव्ह रूग्ण

174

नांदेड, दि ८ ( राजेश भांगे ) – आज दि . ०८ रोजी प्राप्त झालेल्या एकूण प्राप्त २३ थ्रोट स्वॅब नुसार २० अहवाल निगेटिव्ह तर ३ तपासणी अहवाल हे पॉझीटीव्ह प्राप्त झाले आहे .

पॉझीटीव्ह प्राप्त अहवाला नुसार २ रुग्ण ( महिला वय वर्ष ३६ आणि पुरुष वय वर्ष ३८ ) हे अबचलनगर नांदेड आणि १ रुग्ण ( पुरुष वय वर्ष ३५ ) हा रविनगर येथील रहिवासी आहे . हे सर्व रुग्ण हे अबचलनगर येथील सुरुवातीस बाधित असलेल्या रुग्णांच्या निकटवर्तीय संबंधातील आहेत . काल दिनांक ०७ / ०५ / २०२० रोजी कोविड़ – १९ आजाराच्या मार्गदर्शक सूचनांनुसार त्यांचे दुसऱ्यांदा प्रोट स्वब घेण्यात आलेले होते , यापूर्वी प्रथमतः घेण्यात आलेले त्यांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह झालेले होते .

सद्यस्थितीत सदर तिन्ही रुग्णांवर यात्री निवास कोविड केअर सेंटर येथे उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे . आज प्राप्त ३ पॉझीटीव्ह अहवालामुळे नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या हि ३८ वर पोहोचली आहे .

तरी जनतेने अफवांवर विश्वास ठेऊन नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये तसेच जिल्हा प्रशासनास मदत करावी.