Home सातारा ती कोरोना रुग्णाची सेवा करत आहे

ती कोरोना रुग्णाची सेवा करत आहे

146

मायणीची डॉ.सोनल देशमुख लढतेय कोरोनोच्या विरोधात….

मायणी ता.खटाव.जि.सातारा (सतीश डोंगरे )
सध्या देशासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोरोनाव्हायरस चा प्रादुर्भाव वाढत चाललेला दिसून येत आहे त्याच पार्श्वभूमीवर सरकारने लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे यावेळी १७ मे पर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आलेला आहे अशा या परिस्थितीमध्ये मायणीची सोनल देशमुख ही सातारच्या क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयांमध्ये कोरोनाच्या विरोधात लढत आहे तेथे ती कोरोना रुग्णाची सेवा करत आहे
सोनल सिद्धनाथ देशमुख तिचे प्राथमिक शिक्षण मायणी येथे झाले तर माध्यमिक शिक्षण विट्याच्या मॉडर्न एज्युकेशन सोसायटी येथे झाले तसेच बी.ए.एम.एस हे मायणी च्या मेडिकल कॉलेज येथे झाले ती सद्या तिथे इंटरशीप म्हणून गेली दीड महिना आपली सेवा बजावत आहे तिच्या या सेवेबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे सोनल ही प्राथमिक शिक्षक सिद्धनाथ देशमुख यांची कन्या आहे

चौकट
संपूर्ण देश कोरोणाच्या विरोधात लढत आहे तसेच या महाभयंकर रोगा पुढे चांगल्या चांगल्या देशांनी मान टाकल्या आहे अशा परिस्थितीत माझी मुलगी तिची सेवा प्रामाणिक पणे निभावत आहे याचा नक्कीच आनंद आहे

सिद्धनाथ देशमुख (सोनलचे वडील)