Home मराठवाडा नायगांव तालूक्यातील पोलिसांच्या सर्तकतेमुळे कहाळा ( बु.) शिवारात गावठी दारू जप्त

नायगांव तालूक्यातील पोलिसांच्या सर्तकतेमुळे कहाळा ( बु.) शिवारात गावठी दारू जप्त

179
0

नांदेड , दि. ०३ – ( राजेश भांगे ) – संपूर्ण देश व राज्यासह नांदेड जिल्हा सुद्धा कोरोना व्हायरच्या सावटाखाली असतानाच येथील अवैध धंदे चालक मात्र “निर्लजम सदा सुखम” या मणी प्रमाणे संचारबंदि काळातही नायगांवा तालूक्यातील कहाळा ( बु.) शिवारात वजीरगाव फाट्यावर गावठी हातभट्टी दारू नेताना दोघांना पोलिसांनी पकडल असून याबाबत कुंटूर पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अधिक माहितीनुसार, १ मे या महाराष्ट्र दिनाच्या दिवशी कुंटूर पोलीस स्टेशन चे बरबडा बीट जमादार अशोक दामोदर, पोलीस नाईक भार्गव सुवर्णकार व होमगार्ड परमेश्वर राठोड हे आपले कर्तव्य बजावत असताना कहाळा (बु.) शिवारात त्यांना अवैध दारू मोटार सायकली वरून कोणीतरी नेत असल्याची गुप्त माहिती दिली. त्यानुसार सदरील कर्मचाऱ्यांनी वजीरगाव मार्गे येणाऱ्या एका दुचाकीला अडवून त्यांची चौकशी केली असता, एका प्लास्टिक कॅनमध्ये गावठी ३५ लिटर हातभट्टीची सात हजार रुपये किंमतीची अवैध दारू आढळून आली असून, ही गावठी दारू आणि त्यांची होंडा कंपनीची एक मोटर सायकल यावेळी जप्त केली आहे. बरबडा बीट जमादार अशोक दामोदर यांच्या फिर्यादीवरून विकास शिवाजी पवळे वय – २५ व साईनाथ चुडामन निळकंठे वय – २५ दोघेही रा. चिखली ता. कंधार यांच्यावर कुंटूर पोलीस स्टेशन मध्ये
गु.र.क्र.७७/२०२० कलम ६५(ई),८३ कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.