Home विदर्भ दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण.!

दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण.!

197

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा , दि. ०२ :- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात झालेल्या या ध्वजारोहण कार्यक्रमास जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सचिन ओंबासे, पोलीस अधीक्षक डॉ बसवराज तेली, अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी प्रज्ञा डायगव्हाणे, तहसीलदार प्रीती डुडुलकर उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर पाळून साधेपणाने हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.