Home विदर्भ वर्धा जिल्ह्यातील हुसनापूर येथे वर वधूला केले क्वारंटाईन.!

वर्धा जिल्ह्यातील हुसनापूर येथे वर वधूला केले क्वारंटाईन.!

50
0

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा – जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील हुसनापूर येथील पंकज पद्यमाकर नाल्हे या युवकांचे लग्न मांगलादेवी ता. नेर जिल्हा यवतमाळ येथील मुली सोबत २९ एप्रिल रोजी नेर तालुक्यातील मांगलादेवी येथे संपन्न झाले २)आँनलाईन परवानगी घेवू वर पंकज व त्याचे मोठे बंधु वैभव आणि गाडी चालक अर्जून नामदेव वाहारे असे तिन व्यक्ती वधु मंडपी जावून फक्त वर वधूनी साध्या पध्दतीने सामाजिक अंतर ठेवून लग्न आटोपले नंतर दुपारी ४ वाजता हुसनापूर येथे फक्त वधुला घेवून आले .लगेल आरोग्य सेवक दिलीप उटाणे यांना माहीती दिली . जो पर्यत आरोग्य पथक येवून आरोग्य तपासणी करुन क्वारंटाईन करीत नाही तो पर्यत घरात प्रवेश करणार नाही* असे वराने सांगितले .
लग्न सोहळ्या जाण्यापूर्वी कुटुंब प्रमुखानी परवानगी पञ आरोग्य विभागाला दिले .परवानगी पञात नमुद केल्या नुसार वाहनाला निर्जंतुकीकरण व सोबत प्रत्येका कडेसँनीटायझर ठेवले होते.एक तासाने वैद्यकीय अधिकारी डॉ नियाजी आरोग्य सेवक दिलीप उटाणे माधव कातकडे आरोग्य सेवीका वृंदा घोडमारे कु.डडमल व आशा वर्कर कुसूम नाल्हे पो पाटील मेघा भगत यांच्या आरोग्य पथकाने तपासणी करून वर वधू व इतर दोन व्यक्तीना होम क्वारंटाईन केले.
नाल्हे परिवाराने यवतमाळ जिल्ह्यातून आल्यामुळे स्वताहून आरोग्य विभागास माहीती दिल्या बद्दल आरोग्य विभागाच्या पथकाने टाळी वाजवून अभिनंदन केले , गावातील नागरीक आपल्या घरा समोर उभे राहून टाळ्या वाजवून नवदापत्यांचे स्वागत करीत होते हे विषेश.