Home मराठवाडा नांदेड, पिरबुराहणनगर येथील ६४ वर्षीय कोरोना बाधित व्यक्तीचा मृत्यू ; उपजिल्हाधिकारी डॉ...

नांदेड, पिरबुराहणनगर येथील ६४ वर्षीय कोरोना बाधित व्यक्तीचा मृत्यू ; उपजिल्हाधिकारी डॉ सचिन खल्लाळ यांची माहिती

130
0

नांदेड , दि. ३० ( राजेश भांगे ) – नांदेड जिल्ह्यातील पिरबुराहण नगर येथील ६४ वर्षीय कोरोना बाधीत रूग्णाचा दुसरा अहवाल नुकताच निगेटिव्ह आला होता, त्या रूग्णाचा मृत्यू झाला असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ खल्लाळ व डॉ. राजेश चव्हाण यांनी दुजोरा दिला आहे.

पिरबुऱ्हाणनगर भागातील त्या कोरोनाग्रस्त व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या काही दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. पण दिवसेंदिवस त्याची प्रकृती खालावत होती. मधुमेह, अस्थमा यासह अनेक आजार असल्याने तो उपचाराला प्रतिसाद देत नव्हता आणि शेवटी गुरुवारी दुपारी त्याने आपले प्राण सोडले.