Home महत्वाची बातमी
59
0

देऊळगावराजात चिमुकल्यांचा पहिला रोजा!

प्रतिनिधी:-(रवि आण्णा जाधव)
देऊळगावराजा :- पवित्र रमजान महिन्यात आपल्या जीवनाचा पहिला रोजा पूर्ण करून देऊळगावराजा शहरातील चिमुकल्यांनी ह्या जगाचा निर्माता अल्लाहप्रती आपल्या संवेदना व्यक्त केल्या.
शहरातील अफिफा नाज हारून शाह हिने (वय ६) एक रमजान रोजी आपल्या जीवनातील पहिला रोजा ठेवला तर इफराजखान इम्रानखान कोटकर ह्या चिमुकल्याने दोन रमझान रोजी आपल्या जीवनाचा पहिला रोजा पूर्ण केला. सध्याचे तापमान आणि रखरखत्या उन्हात पहाटे पाच वाजेपासून सायंकाळी सात वाजेपर्यंत अन्नाचा एक कण आणि पाण्याचा एक घोट न घेता दिवसभर उपाशी राहून त्यांनी अल्लाहप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली. एवढ्या कमी वयात आपल्या जीवनाचा पहिला रोजा पूर्ण केल्याबद्दल या चिमुकल्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.