Home जळगाव मदत नव्हे कर्तव्य – आमदार किशोर पाटील

मदत नव्हे कर्तव्य – आमदार किशोर पाटील

62
0

शिवसेना – युवासेनेतर्फे १० हजार किराणा मालाचे किट वाटप

निखिल मोर

पाचोरा – देशासह महाराष्ट्रातही कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढत असतांनाच पाचोरा – भडगांव मतदार संघात गेल्या महिनाभरापासून शिवसेना, युवासेना, सामाजिक संस्था व व्यापारी बांधवांनी आप – आपल्या कुवतीनुसार अहोरात्र गोर – गरिब नागरिकांना मदतीचा हात देत जीवनावश्यक वस्तुंसह मोफत जेवणाची व्यवस्था केली. परंतु लाॅक डाऊनचा कालावधी वाढल्यानंतर गोर – गरिब नागरिकांना जीवनावश्यक किराणा मालाची गरज असतांना येथील आमदार किशोर पाटील यांचे नैतृत्वाखाली शिवसेना, युवासेनेतर्फे अपंग, विधवा महिला, ऊसतोड कामगार, ज्यांचेकडे रेशन कार्ड नाही अशा गोर – गरीब गरजु नागरिकांना तांदूळ – ५ किलो, गव्हाचे पीठ – ५ किलो, मिठ – १ किलो, तूरडाळ – १ किलो, तेल १ किलो, हळद, मिर्ची पावडर, गूळ ५०० ग्रॅम, हरबरा डाळ – १ किलो याप्रमाणे दि. २६ एप्रिल पासुन १० हजार किराणा किटचे वाटप केले जाणार आहे. यावेळी आमदार किशोर पाटील यांनी सांगितले की, पाचोरा – भडगांव मतदार संघात आज पर्यंत एकही कोरोना बाधीत रुग्ण किंवा संशयीत आढळुन आलेला नाही. ही स्थिती पुढेही कायम ठेवण्यासाठी पाचोरा – भडगांव तालुक्यातील नागरिकांनी लाॅक डाऊनचे तंतोतंत पालन करावे, अत्यावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठीच बाहेर निघावे, तोंडाला मास्क लावावे, सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे,असे आवाहन ही यावेळी केले आहे. याप्रसंगी नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष शरद पाटे , उद्योगपती मुकुंद बिल्दीकर, जगदीश पटवारी, स्वीय सहाय्यक राजेश पाटील, सुमित पाटील उपस्थित होते.