Home मराठवाडा परभणीत दीड हजार शेतकऱ्यांची मोफत कापूस नोंदणी

परभणीत दीड हजार शेतकऱ्यांची मोफत कापूस नोंदणी

144

सखाराम बोबडे पडेगावकर यांचा पुढाकार

परभणी / गंगाखेड – लाॅकडाऊनमुळे घराच्या बाहेर पडता येत नसलेल्या व अँड्रॉइड मोबाईल नसलेल्या अशा एकूण दीड हजार शेतकऱ्यांची कापूस नोंदणी मोफत मध्ये करण्यात आली. धनगर साम्राज्य सेना चे संस्थापक सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या पुढाकारातून जिल्हाभरातील शेतकरयांची ही नोंदणी करण्यात आली.

लॅकडॉऊन झाल्यानंतर इतर सर्व वर्गासोबत शेतकरी वर्गास सुद्धा अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यात घरातील कापूस विक्री करणे ही सर्वात मोठी अडचण होती. कामानिमित्त बाहेर शहरात गेलेले घरातील काही सदस्य गावाकडे परतले आणि त्यात सर्वांनी घरीच राहायचे, एकूणच कमी असलेल्या जागेत वाढलेली सदस्य संख्या आणि घरात असलेला हा कापुस अशी तिहेरी शेतकऱ्यांना करावी लागली. शासनातर्फे कापसासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यासंदर्भात एक लिंक सोशल माध्यमाद्वारे प्रसारित करण्यात आली या माध्यमातून 26 तारखेपर्यंत परभणी जिल्ह्यातील 36 हजार शेतकऱ्यांनी कापसाची नोंदणी केली. काही शेतकऱ्यांना लाॅकडाऊनमुळे घराच्या बाहेर पडणे खरोखरच खूप अवघड होते. आणि काहीजणांकडे अँड्रॉइड मोबाईल अथवा त्या गावात ग्राहक सेवा केंद्र
नसल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या होत्या.धनगर साम्राज्य सेनेचेच संस्थापक,तथा परभणी लोकसभा ऊमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांचे कडुन या काळात अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत म्हणून मोफत मध्ये घरबसल्या ऑनलाइन नोंदणी करून देण्याचे जाहीर करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद म्हणून परभणी लोकसभा मतदारसंघातील सुमारे दीड हजार शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे मोबाईल नंबर वर, व्हाट्सअप द्वारे नोंदणी साठी लागणारे सर्व कागदपत्रे आणि माहिती पाठवली. या शेतकऱ्यांची नोंदणी यशस्वी झाल्याचा अहवालही शेतकऱ्यांना पाठवण्यात आला. अडचणीच्या काळात शेतकऱ्यांसाठी मोफत नोंदणी अभियान वरदान ठरले.