Home मराठवाडा लांजी येथील अवैध रेती साठ्या प्रकरणी तलाठी पेंटेवाड निलंबित…!

लांजी येथील अवैध रेती साठ्या प्रकरणी तलाठी पेंटेवाड निलंबित…!

136
0

मजहर शेख

साहाय्यक जिल्हाधिकारी यांची कारवाई

नांदेड / माहूर – माहूर तालुक्यातील पैनगंगा नदीच्या तीरावर वसलेल्या लांजी येथील जप्त करण्यात आलेल्या रेती साठया प्रकरणी जबाबदार धरून त्या सज्जाचे तलाठी पेंटेवाड यांना सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी आज दिनांक 23 रोजी निलंबित केले आहे.

लॉक डाऊन कालावधी तही अवैध रेती तस्करी जोमात सुरू असल्याची माहिती सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांना मिळाल्या वरून दिनांक १२ एप्रिल रोजी त्यांनी सायंकाळी अचानक लांजी येथे भेट देऊन साठवून ठेवलेला 100 ब्रास रेती साठा जप्त केला होता. याप्रकरणी त्या सज्ज्याचे तलाठी पेंटेवाड यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. तलाठी पेंटेवाड यांनी दिलेल्या खुलास्यात समाधान न झाल्याने व या पूर्वी अनेक वेळा लांजी येथील अवैध रेती उत्खनन व वाहतुकी संदर्भात नोटीस देऊनही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने जिल्हाधिकारी यांच्या पत्रान्वये आज दिनांक 23 रोजी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी पेंटेवाड तलाठी यांना निलंबित करून पुढील काळात किनवट मुख्यालयाला त्यांची सेवा जोडली आहे कारवाईने अवैध रेती उत्खननाला पाठीशी घालणाऱ्या आधिकारी व कर्मचार्‍यांचे धाबे दणाणले असून माहूर तालुक्यात मात्र अजूनही हडसनी व परिसरात शेकडो ब्रास रेती साठा जंगलात साठवून ठेवलेला आहे हे विशेष.

तहसीलदार , सिद्धेश्वर वरणगावकर

लांजी येथे १०० ब्रास रेती साठा सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांनी यांनी १२ रोजी जप्त केला होता.१३ रोजी पंचनामा करून अहवाल सहाय्यक जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविले होते.सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी अवैध उत्खनन व वाहतुकीस माहूर चे अतिरिक्त कार्यभार असलेले तलाठी पेंटेवाड यांना निलंबित करण्यात आले आहे…