Home मराठवाडा रात्री चांदण्याच्या प्रकाशात पोस्टमन यांनी AEPS च्या द्वारे बँके खात्यातील पैसे केले...

रात्री चांदण्याच्या प्रकाशात पोस्टमन यांनी AEPS च्या द्वारे बँके खात्यातील पैसे केले वाटप:

164
0

पोस्टमनच्या कर्तव्यनिष्ठेला सलाम..

■ भारतीय डाक विभागाच्या माध्यमातून लॉक डाउन मध्ये देखील अर्थव्यवस्था मजबुत होईल

नांदेड / इस्लापुर दि.२३ किनवट तालुक्यातील परोटी बीओ चे शाखा डाकपाल रवी वाडीकर हे लॉक डाउन व जमावबंदी मध्ये आपले कर्तव्य इमानदारीने पार पाडीत असल्याचे दिसून येत आहे.
पोरोटी गाव व परोटी तांड्यातील नागरिक बँकेच्या खात्यात पैसे जमा असून हतबल झाले होते.


गावातील नागरिक सर्व शेती वर अवलंबून आहे.
ही शेती निसर्गाच्या पाण्यावर आहे.कोरड वाहू शेती व मजुरी करून या गावातील नागरिकांचा उदरनिर्वाह चालत असतो.
सरकारने अन्न धान्य व जेवण्याची व्यवस्था गोरगरीब नागरिकांना केली.त्याचं बरोबर गरीबाच्या खात्यात अत्यावश्यक वस्तू, दवाखान्यात उपचार भाजी पाला खरेदीसाठी जनधन,निराधार,अपंग,अंध,किसान सन्मान योजना, विधवा पेन्शन, जेष्ठ नागरिकांचे पेन्शन बँक खात्यात जमा केले.पण बँकेत जाता येत नाही.
आलं तरी पोलिसांचा प्रसाद मिळत असे.
आशा परिस्थितीत पोस्टमन यांनी गावातील नागरिकांना
तुम्ही घरीचं रहा ….सुरक्षित रहा..मी आपल्या बँकेचे पैसे घरपोच AEPS देतो असे गावात जाऊन जनजागृती केली.
■ आज सकाळ पासूनच त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात जनधन व निराधार व बँकेतील पैसे AEPS म्हणजे आधार एनेब्लड पेमेंट सर्व्हिस नागरिकांना कोणत्याही बँकेतील खात्यातील पैसे पोस्ट बँक मार्फत घर बसल्या नागरिकांना यांचा लाभ घेता येतो.
___________________________________________
■ पण बँकेती खात्याला आधार क्रमांक जोडणे
आवश्यक आहे.
____________________________________________
■ पोस्टमन वाडीकर यांनी आज रात्री आठ वाजेपर्यंत चांदण्याच्या प्रकाशात आणि मोबाईलच्या बॅटरी च्या प्रकाशात जनधन, निराधार,बँकेतील पैसे,विधवा पेन्शन,जेष्ठ नागरिकांचे पेन्शन AEPS व डाक विभागाच्या मायक्रो ATM मार्फत पैसे वाटप केले.
___________________________________________
■ पैसे वाटप करीत असताना सोशेल डिस्टन्सिंग तंतोतंत पालन करत आहेत.
____________________________________________
“■ ग्रहांकाना घरपोच मायक्रो ATM व AEPS द्वारे पैसे देण्याची सेवा नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात डाक अधीक्षक शिवशंकर बी लिंगायत यांच्या नेतृत्वाखाली ही योजना राबविण्यात येत आहे.
____________________________________________
■ लॉक डाउन मध्ये व्यवसाय, उद्योगधंदे जरी बंद आसले तरी भारतीय डाक विभाग संपुर्ण देशात निशुल्क डिजिटल पेमेंट पोस्ट बँके मार्फत करत असल्याने भारताची अर्थव्यवस्था मजबुत करण्यात डाक विभागाचा मोलाचा वाटा राहील असे जनते मधून चर्चा केली जात आहे.
____________________________________________
■ नागरिकांनी बँकेतील पैसे काढण्यासाठी बँकेत गर्दी न करता आपले आधार कार्ड बँकेला जोडले आसले तर आपल्याला वाड्या, तांड्यात,ग्रामीण भागात, शहरात पोस्टमन मार्फत बँकेचे पैसे घरपोच मिळतात.
नागरिकांनी घरीचं राहा..सुरक्षित राहा.घरा बाहेर येऊ नका. प्रशासनास मदत करा.
यावेळी असे अहवान डाक विभागाच्या वतीने करण्यात आले.