Home मराठवाडा औरंगाबाद विभागांतर्गत आठ जिल्ह्यांमधुन एकुण ६० कोरोनाबाधितांवर उपचार सुरू

औरंगाबाद विभागांतर्गत आठ जिल्ह्यांमधुन एकुण ६० कोरोनाबाधितांवर उपचार सुरू

106
0

विशेष प्रतिनिधी – राजेश भांगे

औरंगाबाद विभागांतर्गत आठ जिल्ह्यांमध्ये एकूण ६० कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. औरंगाबाद येथे ३८ रुग्‍ण (५ रुग्णांचा मृत्‍यू झालेला आहे व १५ रुग्‍ण बरे झाल्‍यामुळे डिस्‍चार्ज देण्‍यात आला आहे), जालना-२, परभणी-१, हिंगोली-७ (एक रुग्‍ण हा बरा झाल्‍यामुळे त्‍यास डिस्‍चार्ज देण्‍यात आले आहे), नांदेड-१, लातूर-८ (सर्व रुग्‍ण हे बरे झाल्‍यामुळे त्‍यांना डिस्‍जार्ज देण्‍यात आले आहे) आणि उस्‍मानाबाद-३ (सर्व रुग्‍ण बरे झाल्‍यामुळे त्‍यांना डिस्‍जार्ज देण्‍यात आले आहे) रुग्‍णांचे निदान झाले आहे. आज रोजी औरंगाबाद विभागांतर्गत वस्‍तुतः २८ कोरोना बाधित रुग्‍णांवर उपचार चालू आहेत. (औरंगाबाद-१८, जालना-२, परभणी-१, हिंगोली-६ व नांदेड-१)
तपासणीसाठी आजपर्यंत एकूण नमुने ३८८६ नमूने घेण्‍यात आले आहेत. त्‍यापैकी ३४७९ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले असून ३५९ चे अहवाल प्रतिक्षेत आहे. प्राप्त अहवालापैकी ३४१९ नमुने निगेटीव्ह आहेत व ६० नमुने पॉझिटीव्ह आहेत. ४८ नमूने मानांकानुसार नसल्‍याने परत करण्‍यात आले आहेत. आतापर्यंत ५ रुग्‍णांचा मृत्‍यू झालेला आहे व २७ रुग्‍ण हे कोराना विषाणू संक्रमणातून बरे झाल्यामूळे रुग्णालयामधून सोडण्यात आलेले आहे. विभागामध्‍ये सध्‍या २९३९ व्‍यक्तिंना घरीच विलगीकरणात व ११०६ व्‍यक्तिंना संस्‍थात्‍मक विलगीकरणात ठेवण्‍यात आले आहे. तसेच १४८० व्‍यक्तिंना अलगीकरण कक्षात (Isolation ward) ठेवण्‍यात आले आहे.
स्‍थलांतरित मजुरांसाठी विभागामध्‍ये सध्‍या १९१ मदत शिबीरे उभारण्‍यात आली आहेत. या मध्‍ये सध्‍या १७६९८ स्‍थलांतरीत मजुर वास्‍तव्‍यास आहेत. या मजुरांच्‍या जेवणाची, वैद्यकीय तपासणीची व इतर अनुषंगीक बाबींची व्यवस्था या शिबीरामध्ये करण्‍यात आली आहे.
विभागातील १३६ शिवभोजन केंद्रामधून ५/- प्रति थाळी प्रमाणे १४२५० थाळया वितरीत करण्‍याची व्‍यवस्‍था करण्‍यात येत आहे. विभागातील शासकीय गोदामांमध्‍ये दि.२२.०४.२०२० रोजी एकुण ५०,८१७.५८ मे.टन इतका अन्‍यधान्‍य, साखर इत्‍यादीचा साठा आहे. विभागात प्राधान्‍य कुटूंब योजना व एपीएल शेतकरी योजने अंतर्गत नियमित धान्‍य वाटप करण्‍यात येत असून या व्‍यतिरीक्‍त प्रधानमंत्री गरीब कल्‍न्‍याण अन्‍न योजनेअंतर्गत प्रति व्‍यक्‍ती ५ किलो मोफत तांदुळ एप्रिल ते जून २०२० या कालावधीसाठी वितरीत करण्‍यात येत आहे.
विभागामध्‍ये आढळून आलेल्‍या कोरोना बाधीत रुग्‍णांच्‍या संपर्कात आलेल्‍या व्‍यक्‍तींचाही पाठपुरावा करण्‍यात येत असून आतापर्यंत अशा १४५७ व्‍यक्‍तींना शोध घेण्‍यात आलेला आहे. यापैकी ५३९ लोकांचे स्‍वॅब घेण्‍यात आले असून त्‍यामध्‍ये २२ नमुने पॉजिटिव्‍ह, ४९४ नमुने निगेटिव्‍ह चे अहवाल प्राप्‍त आहे व २३ स्‍वॅबचे अहवाल प्रलंबित आहे.
विभागात को‍वीड-१९ मुळे उद्भवलेल्‍या आजारावर प्रतिबंध व उपचारास्‍तव १२२ (जालना-१०, नांदेड येथील शासकीय रुग्‍णालयासाठी १० व वैद्यकीय महाविद्यालयासाठी १५ असे एकुण २५, हिंगोली-८, बीड-२०, लातूर-८, उस्‍मानाबाद-३६, औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्‍णालय साठी ५ व बीड येथील स्‍वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्‍णालय अंबाजोगाई साठी १०) व्‍हेंटीलेटरखरेदी करण्‍याबाबत शासनाकडून मान्‍यता देण्‍यात आलेली असून उर्वरीत जिल्‍हयांकरीता खरेदी करण्‍याबाबतची कार्यवाही सुरु आहे.
केंद्र शासनाचे आरोग्‍य व कुटूंब कल्‍याण मंत्रालय विभागामार्फत राज्‍यातील संशयीत / बाधित कोवीड-१९ रुग्‍णांवर योग्‍य व्‍यवस्‍थापन करण्‍याबाबत मार्गदर्शक सुची सादर केलेली आहे. सदर सुचीनुसार तीन प्रकारच्‍या कोविड समर्पित सुविधा (Covid Dedicated Facilities) प्रस्‍तावित केलेल्‍या आहेत. सदर सुविधांमध्‍ये १. Covid Care Center (CCC)-सौम्‍य व अतिसौम्‍य संशयित अथवा बाधित कोविड रुग्‍णांकरीता सुविधा पुरविण्‍यात येईल असे केंद्र, २.Dedicated Covid Health Center (DCHC)-वैद्यकीयदृष्ट्या मध्यम म्हणून नियुक्त केलेल्या अशा सर्व प्रकरणांची काळजी घेणारी रुग्णालये व ३. Dedicated Covid Hospital (DCH)- ज्‍या रुग्‍णांना वैद्यकीयदृष्‍टया गंभीर व बाधित म्‍हणुन नमुद केलेले आहे अशा रुग्‍णांकरीता प्रामुख्याने सर्वसमावेशक काळजी घेईल अशी रुग्‍णालये स्‍थापन करण्‍याबाबत सुचित केलेले आहे. त्‍यानुसार विभागात एकुण १५५ Covid Care Center (CCC) ज्‍यामध्‍ये एकुण ७०४६ खाटांची क्षमता आहे, ४७ Dedicated Covid Health Center (DCHC) ज्‍यामध्‍ये एकुण १९४० खाटांची क्षमता आहे व २० Dedicated Covid Hospital (DCH) ज्‍यामध्‍ये एकुण २२७० खाटांची क्षमता आहे, अशी सुविधा तयार करण्‍यात आलेली आहे.
कारोना विषाणूमुळे उद्भवलेल्‍या परिस्थिीत संदर्भात कोणत्‍याही नाग‍रिकास काही मदत, तक्रार अथवा सुचने संदर्भात संपर्क साधावयाचा असल्‍यास ते खालील हेल्‍पलाईन नंबरवर संपर्क साधू शकतील.
१. औरंगाबाद- औरंगाबाद जिल्‍हाधिकारी कार्यालय- ०२४०- २३३१०७
२. जालना- जालना जिल्‍हाधिकारी कार्यालय- ०२४८२- २२३१३२
३. परभणी- परभणी जिल्‍हाधिकारी कार्यालय – ०२४५२- २२६४००
४. हिंगोली- हिंगोली जिल्‍हाधिकारी कार्यालय – ०२४५६- २२२५६०
५. नांदेड- नांदेड जिल्‍हाधिकारी कार्यालय- ०२४६२- २३५०७७
६. बीड- बीड जिल्‍हाधिकारी कार्यालय – ०२४४२- २२२६०४
७. उस्मानाबाद- उस्‍मानाबाद जिल्‍हाधिकारी कार्यालय – ०२४७२- २२५६१८
८. लातूर जिल्‍हाधिकारी कार्यालय – ०२३८२- २४६८०३
९. विभागीय आयुक्‍त कार्यालय, औरंगाबाद- ०२४०- २३४३१६४

विभागीय आयुक्त औरंगाबाद यांनी वेळोवेळी औरंगाबाद येथील जिल्हा ग्रामिण रुग्णालय व घाटी येथील सुपरस्पेशॅलिटी हॉस्पीटल येथे भेटी दिलेल्या असून तेथील रुग्णांची व तेथील सोयी सुविधांची पाहणी करुन आवश्यक त्या सुचना दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे जालना व लातूर येथील रुग्णालयांना भेटी देऊन तेथील रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या सुविधांची पाहणी करुन आवश्यक सुचना दिलेल्या आहेत.
विभागीय आयुक्‍त औरंगाबाद यांनी ८ एप्रिल रोजी परभणी, नांदेड व हिंगोली जिल्‍हयांना भेट देवून जिल्‍हाधिकारी कार्यालयात बैठक घेवून कोरोना संदर्भीय केलेल्‍या उपाय योजना व सद्यस्थितीबाबत आढावा घेतला आहे तसेच सर्व संबंधीत यंत्रणांना आवश्‍यक त्‍या सुचना दिलेल्‍या आहेत.