Home विदर्भ शेतकर्याचा शेतमाल थेट ग्राहकांच्या दारात……

शेतकर्याचा शेतमाल थेट ग्राहकांच्या दारात……

99
0

शेतकरी ग्राहक साखळी उभारणीचा उपक्रम सुरु…..

देवानंद खिरकर

अकोला / अकोट – कोरोना विषाणुचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये शेतकरी पुर्ण अडचणीत सापडलेला आहे.या पृस्ठभुमीवर शेतकरी ते ग्राहक साखळी उभारुन शेतकर्याच्या शेतमाल थेट ग्राहकांच्या दारात पोहचविण्याचा उपक्रम अकोला शहरातील देशमूख फाइल मधे सुरु करण्यात आला.केळी,टरबूज,भाजीपाला अशी अनेक पीके शेतात उभी आहेत.बाजारपेठेत शेतकर्याच्या मालाला उठाव नसल्याने नाशवंत शेतमाल नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.या समस्येवर उपाय म्हणूण पालकमंत्री बच्चू कडू यांच्या संकल्पनेतून शेतकरी ते थेट ग्राहक साखळी उभारुन शेतमाल थेट ग्राहकांच्या दारापरंत पोहचविण्याचा उपक्रम 21 एप्रिल रोजी अकोला शहरातील देशमूख फाईल येथे अकोल्याचे उपवीभागिय अधिकारी डॉक्टर निलेश अपार व माजी जिल्हाधिकारी अशोक अमानकर यांच्या उपस्थीतीत सुरु करण्यात आला.केळी,टरबूज,भाजीपाला शेतमाल मुद्दल भावात थेट ग्राहकापरंत पोहचवीण्यात येत आहे.शहरातील स्वस्त धान्य दुकाने तसेच मोक्याच्या शासकीय जागा शेतकर्यासाठी ऊपलब्ध करुन या ठीकाणाहून शेतकर्याच्या शेतमालाची माफक दरात ग्राहकांना विक्री करण्यात येणार आहे.असे आवहन उपविभागिय अधिकारी निलेश अपार यांनी केले आहे.