Home जळगाव सावदा पालिकेस सॅनिटायझर निर्जंतुकीकरण  प्रवेश द्वार बाथ संच भेट…!

सावदा पालिकेस सॅनिटायझर निर्जंतुकीकरण  प्रवेश द्वार बाथ संच भेट…!

214
0

प्रदीप कुलकर्णी – सावदा

करोना व्हायरस चा प्रादुर्भावला प्रतिबंध घालण्या साठी येथील न्यू भारत रोलिंग शटर चे संचालक नाझरुद्दीन लोहार व आदिल नसरूद्दीन लोहार यांच्या तर्फे आधुनिक पद्धतीचा सॅनिटायझर निर्जंतुकरण प्रवेश द्वार बाथ संच तय्यार करून पालिकेत येणाऱ्या नागरिकांच्या सेवेत पालिकेला दि ; १८ रोजी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास पालिका मुख्याधिकारी सौरभ जोशी यांचे सह स .पो. नि .राहुल वाघ यांच्यासह मान्यवर उपस्तीत लोकार्पण करण्यात आला .

सदर प्रसंगी मुख्याधिकारी सौरभ जोशी यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले तेव्हा स.पो.नि. राहुल वाघ, राजेश वानखेडे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक, फिरोज लेफ्टी माजी नगरसेवक, शोएब लोहार, चोळके पालिका कार्यालय अधीक्षक ,संदीप पाटील ,लाला कोष्टी ,श्याम पाटील,प्रवीण पाटील यांच्या उपस्थिती होती .

सदर सॅनिटायझर बाथ संच हे अत्याधुनिक पद्धतीचा संच बाथ नाझरुद्दीन लोहार यांच्या मार्गदर्षणाखाली त्यांचे चिरंजीव शोएब लोहार व सहकारी नायनू लोहार,जुनिद लोहार यांनी किमान ८ फूट उंचीचा आटोप्रे सेन्सर असलेल्या पाण्याच्या टाकीत किमान एक लिटर सॅनिटायझर मध्ये २० लिटर पाण्यात मिश्रण करून चा उपयोग घेण्या साठी या संचावर हात धोण्या साठी उभे रहाताच त्यावर प्रेशर येताच प्रे द्वारे पाणी हातावर पडून आटोमॅटिक हात घुतले जातात लेल्या तळ भागातील प्लॉटफॉम् वर उभे राहताच त्यावर पडलेल्या क वापर करू शकतो किमान या संच निर्मितीस १०,००० रु ( दहा हजार रु येत असल्याचे लोहार यांनी सांगितले .संच त्यांनी लोकार्पण केला .