Home विदर्भ पालकमंत्री केदारांच्या वतीने राशन कार्ड नसलेल्या गरजू कुटुंबाना धान्य वाटप.!

पालकमंत्री केदारांच्या वतीने राशन कार्ड नसलेल्या गरजू कुटुंबाना धान्य वाटप.!

48
0

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

आमदार रणजीत कांबळेनी मांडली होती अशा परिवाच्या काळजीची घेण्यांची सुचना…

वर्धा – ता. २० : पालकमंत्री सुनील केदार यांच्या वतीने सिंदी रेल्वे शहरातील गरंजुमंत गरीब परिवार ज्यांच्याकडे राशन कार्ड नाही अशा १९८ परिवारांना रविवारी (ता. १९) कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांचे हस्ते जीवनावश्यक अन्नधान्य कीटचे सिंदी रेल्वे पालिका सभागृहात वितरन करुन सामाजिक जबाबदारीचे वेगळेच उदाहरन सादर केले.

कोरोनाच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर देश लाॅकडाऊन झाला आणि रोजमंजूरी करुन आपल्या परिवारिचा गाडा हाकणारे परिवार बेजार झाले. हाताला काम नाही आणि भुक शांत बसु देईना अशा परिवारासाठी शासणाच्या वतीने राशन दुकानातून काही अल्प दरात तर काही विनामूल्य अन्नधान्याचा वाटप सुरू झाला परिणामता थोडा का होईना या कुटुंबांना आधार मिळाला….!!
मात्र शहरात यातीलच काही दारिद्र्य रेषेखालील परिवार आहे ज्यांच्या कडे आपल्या महसुल विभागाच्या पुण्याईने अध्याप राशन कार्डच नाही. यांचे काय असा गंभीर प्रश्न उपस्थित करुन यांना सुध्दा तात्काळ मदत करण्याच्या सुचना मांजी मंत्री तथा विद्यमान आमदार रनजित कांबळे यांनी पालकमंत्री केदार यांना गत आठवड्यात वर्धा येथे झालेल्या आढावा बैठकीत केल्या होत्या. यावर ना. केदार यानी लागलीच जिल्हातील अशा परिविराचा शोध घेण्याचे आदेश प्रशासणाला दिले आणि यांना मी स्वतः तर्फे अन्नधान्य पुरविणार असल्याचे सांगितले होते त्याच अनुषंगाने प्रशासनाने ताबडतोब शोधलेल्या शहरातील १९८ लाभार्थ्थीपरिवाराला रविवारी (ता. १९)पालकमंत्री सुनील केदार यांच्या वतीने प्राप्त जीवनावश्यक धान्य कीटचे पालिका सभागृहातुन वाटप करण्यात आले.
कनीक, तांदूळ, तुर दाळ, चणा दाळ, मुंग दाळ, मोट आणि तिखट, हळद, मीठ पुडा असलेल्या किठचे शहरातील १९८ परिवारांना वितरन करतांना पालिकेचे बांधकाम सभापती तथा काॅग्रेसचे गटनेता आशिष देवतळे, या वितरण प्रसंगी पलिके मधील कांग्रेस चे गटनेता आशीष देवतळे,नगराध्यक्षा संगीता शेंडे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक प्रकाशचंद्र डफ, नगरसेवक विलास तळवेकर, रमेश ऊईके, नगर सेविका वनिता मदनकर, जयना बोंगाडे, काॅग्रेसचे गजानन खंडाळे,फिरोज बेरा, पालिकेचे मुख्याधिकारी कैलाश झवर,प्राचार्य प्रकाश कामडी, शिक्षक मनोज धन्दरे, मनोहर फुसे,जितेंद्र नागफासे, मनोज तृपकांने आदीची तसेच शहर काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्तेची मोठी उपस्थित होती.

Unlimited Reseller Hosting