Home विदर्भ घरोघरी वृत्तपत्र वाटप करण्याची परवानगी द्यावी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कडे जिल्हा...

घरोघरी वृत्तपत्र वाटप करण्याची परवानगी द्यावी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कडे जिल्हा पत्रकार संघाची मंगणी ,

52
0

देवानंद खिरकर ,

अकोला ,

राज्याचे गृह मंत्री ना अनिल देशमुख यांना अकोला जिल्हा पत्रकार संघाचे शिष्टमंडळाने भेटून राज्यातील ऑरेंज झोन व ग्रीन झोन चे जिल्ह्यामध्ये वृत्तपत्र हाकरस यांना घरोघरी पेपर वाटण्याची परवानगी शासनाने द्यावी अशी मागणी निवेदन देऊन केली , या प्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री ना संजय भाऊ धोत्रे , मराठी पत्रकार परिषदेचे मा.अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा , अकोला जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकत अली मिरसाहेब , सरचिटणीस प्रमोद लाजुरकर, संजय खांडेकर , कमलकिशोर शर्मा , मनीष खरचे ,गणेश सोनोने , अक्षय गवळी व प्रिंट, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार उपस्थित होते , यावेळी जिल्हास्तरीय सर्वच वृत्तपत्रांची शासनाकडे असलेली जाहिरातींची प्रलंबित देयके अदा करण्यात यावी अशी ही मागणी जिल्हा पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने गृह मंत्री ना अनिल देशमुख यांच्या कडे केली , या मागण्यांचे संदर्भात मा.मुख्यमंत्री यांचेशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन गृह मंत्री ना अनिल देशमुख यांनी यावेळी दिले , आमदार रणधीर भाऊ सावरकर, ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा , जिल्हा माहिती अधिकारी डॉ मिलिंद दुसाने या प्रसंगी उपस्थित होते