Home महत्वाची बातमी कार्ला बु , येथे डेंगूचे थैमान. ना , बच्चू कडू यांनी घेतली...

कार्ला बु , येथे डेंगूचे थैमान. ना , बच्चू कडू यांनी घेतली तात्काळ दखल…

56
0

देवानंद खिरकर:=कार्ला बुजरुग येथे

डेंगू या रोगाने थैमान घातले असुन जवळपास 20 रुग्ण डेंगूचे आढळले आहे.अर्थातच हा ढीसळ कारभार दानापूर प्राथमीक आरोग्य केंद्राचा आहे.गेल्या काही दिवसांपासून प्राथमीक आरोग्य केंद्राचे दुर्लक्ष झाले व परिणाम स्वरुप डेंगू या जीवघेण्या आजाराने डोकवर काढल.म्हणून कार्ला बुजरुग येथिल नागरिकांच्या आरोग्यास असणारा धोका लक्षात घेता प्रहारसेवकांंनी ही गोष्ट अकोल्याचे पालकमंत्रि बच्चू कडू यांना सांगितली असता बच्चू कडू यांनी तात्काळ दखल घेत तहसीलदार मार्फत दानापुर प्राथमीक आरोग्य केंद्र यांची कानउघाडणी करत त्यांना कार्ला बुजरुग नागरिकांच्या सेवेसाठी तात्काळ जाण्याचे आदेश दिले.व नागरिकांची आरोग्य तपासणी सुरु झाली.प्रहारसेवक कुलदीप बाजारे,राजेश होपळ,प्रज्वल शेगोकर,गणेश रिंगणे,शंकर ठाकरे,मनोज गवळी आदींची उपस्थिती होती.