Home मराठवाडा गावात मोबाईल ची रेंजचं येतं नाही.. पोस्टमन नी पोस्टाच्या मायक्रो ATM पैसे...

गावात मोबाईल ची रेंजचं येतं नाही.. पोस्टमन नी पोस्टाच्या मायक्रो ATM पैसे देऊन घडवले माणुसकीचे दर्शन

111
0

नांदेड / इस्लापुर दि.१७ – किनवट तालुक्यातील अतिशय दुर्मीळ भागात आणि चारी बाजूंनी जगलं मुळात असलेले आंधबोरी हे गाव आहे.

या गावात जवळपास मोबाईल टावर आहेत पण मोठमोठ्या चारी बाजुंनी माळ असल्याने केव्हाच कोणत्याही कंपनीच्या मोबाईल ची रेंज येत नाही.
डाक विभागाचे सर्व ग्रामीण भागातील पोस्ट ऑफिसचे कामे डिजिटल व संगणक प्रणाली झाल्याने मोबाईल रेंज आवश्यक आहे.
कोरोनाच्या विषाणू साखळी तोडण्यासाठी संपूर्ण जगात जमावबंदी व लोकडाऊन चालू आहे.
गावातील नागरिकांना बाहेर जाता येत नाही. सर्व वाहणे व मार्ग बंद आहेत.
सरकारनी जनतेच्या जनधन, निराधार, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना चे पैसे बँकेच्या खात्यात जमा केले आहे.
या लाभार्थीच्या खात्यातील पैसे AEPS म्हणजे आधार ईनेलिड पेमेंट सर्व्हिस काडून देण्यासाठी आंधबोरी येथील पोस्टमन सुधाकर जाधव यांनी या लोकडाऊन संकट परिस्थितीत मध्ये संकटमोचक काम केले आहे.
पोस्टमन सुधाकर जाधव यांनी आपल्या गावा पासून कांही तीन चार किलोमीटरवर च्या अंतरावरील जगलांत टेकड्यांवर मोबाईलची रेंज येते त्या ठिकाणी जाऊन आपल्या गावातील नागरिकांना निराधाराचे व बँकेतील आणि जनधनचे पैसे AEPS द्वारे पैसे वाटप करून.
पोस्टमन च्या माणुसकीचे दर्शन घडवले आहे….

_________________________
पोस्टमन ची ही राष्ट्र सेवा पाहून नांदेडचे मा.डाक अधीक्षक व डाक निरीक्षक किनवट. आभिनव सिन्हा यांनी पोस्टमन सुधाकर जाधव यांचे कौतुक व अभिनंदन केले.
_________________________
आधार कार्ड क्रमांक व मोबाईल क्रमांक पोस्टमन यांना दिल्यास पोस्टमन यांनी बायोमेट्रिक सिस्टीम वर हाताचा आंगठा दिल्यास एक अंक संदेश खातेरास जातो तो आपल्या खात्यास जोडल्यास आपल्या आवश्यकता प्रमाणे रक्कम एक मिनिटात आपल्याला मिळते.
पोस्टमन सुधाकर जाधव हे आपल्या कार्य क्षेत्रात प्रत्येक नागरिकां सोबत आपली लाळ जोडली गेली आहे.
पोस्टमन जाधव यांचा स्वभाव चागला असल्याने आपल्या बीओ मध्ये नागरिकाच्या डाक खात्याबद्दल अडचणीच्या वेळेस मदत करणे,वेळेवर गावात जाऊन पत्र वाटप करणे,दर महिन्याला गावात प्रत्येकाच्या दारी जाऊन जाऊन आर.डी. व सुकन्या समृद्धि खाते योजना चे आणि ग्रामीण डाक जीवन विम्याचे पैसे भरून घेणे आणि डाक विभाग योजनांची माहिती देणे,डाक विभाग योजनेचा प्रचार व प्रसार करणे. हे त्यांच्यात गुण आहेत.
या कला गुणाने डाक विभागाचा पोस्टमन म्हणून सुधाकर जाधव हे जवळपास वीस गावात त्याचा मोठा परिचय व ओळखले जातात…
पोस्टमन नी कोरोनाच्या संकट एवढे मोठे आसले तरी आंधबोरी बीओ मधील नागरिकांना तुम्ही घरात रहा. बाहेर येऊ नका.मला पैशाची आवश्यकता आहे तेव्हा फोन करा मी तुम्हाला कोणत्याही बँकेतील पैसे तुमच्या घरी डाक विभागाच्या मायक्रो ATM द्वारे पैसे मी काडून देईन.पण तुम्ही शासनाला सहकार्य करा.
कोरोना हरेल… देश जिकेल.. असे पोस्टमन यांनी नागरिकांना संवाद केला.