Home मराठवाडा कोरोनाच्या संदर्भात काही विशिष्ट लोकांच्या चुकीमुळे सर्वच मुसलमानांना जबाबदार धरू नका –...

कोरोनाच्या संदर्भात काही विशिष्ट लोकांच्या चुकीमुळे सर्वच मुसलमानांना जबाबदार धरू नका – डॉ. हिकमत उढाण

86
0

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे

जालना – कोरोना व्हायरसच्या संदर्भात काही विशिष्ट लोकांच्या चूकिमुळे सर्वच मुसलमान लोकांना जबाबदार धरू नका असे आवाहन शिवसेना नेते डॉ हिकमत उढाण यांनी केले आहे.कोरोना व्हायरस विरूद्ध च्या लढ्यात मुसलमान समाज आपल्या सोबत खांद्याला खांदा लावून लढा देत आहे.असेही प्रतिपादन उढाण यांनी केले आहे. कोरोना व्हायरसच्या संदर्भात शासनाचे नियम आणि आदेशाचे तंतोतंत पालन करावे, स्वस्तधान्य दुकानातील राशन गोरगरिबांना मिळाले पाहिजे, स्वस्तधान्य दुकानात काळाबाजार होणार नाही या बाबतीत सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी दक्ष राहावे ,स्वस्तधान्य दुकानात माल आलेला आहे दुकानदारांनीही रितसर मालाचे वाटप करावे कुणावरही अन्याय होणार नाही या बाबतीत काळजी घ्यावी..कोरोना हि आपल्या देशावरिल राष्ट्रीय आपत्ती आहे,मोठे संकट आहे, त्याचा मुकाबला करण्यासाठी सर्वांनी काळजी घेतली पाहिजे.समाजात जातीय तेढ निर्माण होईल अशी पोस्ट शोशल मिडियावर टाकू नये .कोरोना व्हायरसच्या लढाई मध्ये आपण अंतिम आणि निर्णायक टप्प्यामध्ये पोहोचलो आहोत. अशा परिस्थितीमध्ये घनसावंगी मतदार संघामधील सर्व नागरिकांना असे आवाहन करण्यात येते कि, शासनाचे जे नियम आहेत, किंवा जे आदेश आहेत विशेषतः सोशल डिस्टंन्सींगच्या संदर्भात जे शासनाचे आदेश आहेत त्याचे तंतोतंत पालन करावे. सोशल मीडियावर आलेली पोस्ट करताना किंवा आलेली पोस्ट फारवर्ड करतांना या काळामध्ये विशेष काळजी घेतली पाहिजे . कोणत्याही राजकीय पक्षावर किंवा राजकीय नेत्यांवर या परिस्थितीत टिकाटिपनी करू नये,कोरोना व्हायरसच्या विरूद्धचे युद्ध आपण नक्कीच जिंकणार असा विश्वासही डॉ हिकमत उढाण यांनी व्यक्त केला.

Unlimited Reseller Hosting