Home विदर्भ ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था उभारणे हे मुख्य उद्दिष्ट – दुग्धविकास मंत्री सुनील केदार

ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था उभारणे हे मुख्य उद्दिष्ट – दुग्धविकास मंत्री सुनील केदार

72
0

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा , दि. १५ :- कोरोनामुळे ग्रामीण भागातुन रोजगारासाठी शहरात गेलेला मजूर, युवक पुन्हा आपापल्या गावात परतला आहे. ग्रामीण भागात केवळ शेती हेच क्षेत्र जास्त रोजगार देऊ शकते. त्यामुळे यावर्षीचे पिकाचे नियोजन करताना गावातील बेरोजगारांना काम कसे देता येईल ग्रामीण अर्थव्यवस्था कशी उभारता येईल हा मुख्य उद्देश ठेऊन कृषी विभागाने यावर्षीच्या पिकाचे नियोजन करण्याच्या सूचना दुग्धविकास व्यवसाय मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी दिल्यात.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज पालकमंत्री श्री केदार यांच्या अध्यक्षतेखाली येणाऱ्या खरीप व रब्बीचे पिकाचे नियोजन करण्यासाठी बैठक आयोजित केली होती. यावेळी त्यांनी शेती व रोजगार याविषयी काही महत्वपूर्ण सूचना केल्यात. या बैठकीला आमदार रणजित कांबळे, जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओंबासें, कृषी सहसंचालक श्री भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, कार्यकारी अभियंता लघु सिंचन व इतर अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले, हे वर्ष कोरोनाने ग्रासलेले आहे. आज सर्व उद्योग ठप्प आहेत. केवळ शेती आणि शेतीशी निगडित उद्योग हे एकमेव क्षेत्र सुरू आहे. या कठीण काळातही केवळ आपला पोशिंदा काम करतोय. देशाला अन्नधान्य, भाजीपाला, फळे, दूध यांची कमतरता भासू नये यासाठी दिवसरात्र काम झटत आहे. या कोरोनाने त्याचे काम अधिक अधोरेखित केले आहे असेही ते म्हणाले.आज शहरातील अनेक युवक, मजूर, कामगार रोजगराआभावी गावात परतले आहेत. पुढेही त्यांना शहरात गेल्यावर रोजगार मिळेलच याची खात्री देता येत नाही. त्यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देणे आणि ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था उभारणे हे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी यावेळी प्रतिपादित केले. त्यासाठी आताच जिल्ह्यातील खरीप व रब्बी पिकाचे नियोजन तयार करणे आवश्यक आहे.
जिल्ह्यात प्रत्येक शेतकऱ्याला दोन पीक घेण्यासाठी प्रोत्साहित करा. मागील तीन वर्षांत सर्वात जास्त दर मिळालेले पीक, त्या पिकाचा उतारा, त्याचे लागवड क्षेत्र, बियाण्याची उपलब्धता याचा सविस्तर अभ्यास व विश्लेषण करून शेतकऱ्यांसमोर ठेवताना यावर्षीच्या परिस्थितीचा संदर्भही समोर ठेवा. पीक पॅटर्न बदलण्यासाठी हळूहळू प्रयत्न करा. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन कमी क्षेत्रात प्रयोग करायला सांगावे. यावर्षी सोयाबीनचे क्षेत्र वाढणार असल्यामुळे त्या बियाण्याची मागणी व पुरवठा याचे नियोजन करावे. असे श्री. केदार म्हणाले.

दुग्ध व्यवसाय वाढीसाठी पशुखाद्य निर्मिती आवश्यक ठरते. जंगली प्राण्यांचा त्रास वाचविण्यासाठी शहरा नजीकच्या शेतात जिथे सिंचन सुविधा आहेत असे शेतकरी निवडून त्यांना मका लागवडीसाठी प्रोत्साहित करावे अशा सूचना त्यांनी केल्यात. येत्या आठ दिवसात याचे नियोजन करावे. पुढील आठवड्यात यासंदर्भात पुन्हा एकदा बैठक घेण्यात येईल असेही श्री केदार यांनी याप्रसंगी सांगितले.