Home मराठवाडा पोस्टमन साहेब , “गोळ्या , औषधी संपली” , निराधाराचे पैसे आलेत...

पोस्टमन साहेब , “गोळ्या , औषधी संपली” , निराधाराचे पैसे आलेत का??

104
0

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

नांदेड / मुखेड – दि.१३ लोकडाऊन मध्ये आणि कोरोनाच्या महामारीत बँकेला जाता येत नाही.बँकेला सतत सुट्या आल्याने अनेक वृद्धधाना बी पी,शुगर आशा आजाराला दररोज वेळेवर गोळ्या औषधी,जेवण आसने आवश्यक आहे.याचं अवस्थेत रातोळी तालुका मुखेड मारोती दुलाजी वरवटे हा वृद्ध निराधार लाभार्थी आहेच त्याचं बरोबर तो अपंग पण आहेच त्याची पत्नी पण अपंग आहे.हे दोघेही चारी बाजूनी कुड लावून वर पत्रे टाकलेल्या घरात असतात. नांदेड डाक टीम चे कर्मचारी रामप्रसाद नागठाने ग्रामीण डाक सेवक रातोळी येथे लोकडाऊन मध्ये घरो घरी जाऊन AEPS व निराधार चे पैसे वाटप करित असत रामप्रसाद यांनी मारोती वरवटे यांना निराधाराचे पैसे देण्यासाठी त्यांच्या घरी गेला तेव्हा मारोती वरवटे एक मोडला होता.पोस्टमनला त्यांनी म्हणाले बापू माझे गोळ्या औषधी संपली माझे पैसे आलेत का? पोस्टमन म्हणाला काका बघतो पोस्टमन नी मारोती चे आधार कार्ड घेतले व इंडिया पोस्ट पेमेंट बँकेला जोडलं आणि बायोमेट्रिक वर आंगठा घेतला त्यांच्या नावे जमा झालेले रुपये तीन हजार रोख रक्कम पोस्टमन यांनी मारोती यांना दिले.
मारोती वरवटे म्हणाले सरकारचे व पोस्ट खात्याचे लयी उपकार बघ..असे आभार मानले.

डाक अधीक्षक शिवशंकर बी लिंगायत यांनी नांदेड डाक टीम चे ग्रामीण डाक सेवक रामप्रसाद यांचे अभिनंदन केले.