Home मराठवाडा कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या नियोजनाबद्दल व उत्तम कामगिरीबद्दल नांदेडचे जिल्हाधिकारी –...

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या नियोजनाबद्दल व उत्तम कामगिरीबद्दल नांदेडचे जिल्हाधिकारी – डॉ विपीन इटनकर यांचेकडून तालुकास्तरीय समाविष्ट यंत्रणेचे कौतुक.

34
0

बालाजी सिलमवार

नांदेड – जागतिक आरोग्य संघटना कोरोना (कोव्हिड-१९) या विषाणूमुळे पसरत असलेला हा आजार साथीचा संसर्गजन्य आजार म्हणून घोषित केला आहे.तसेच कोरोना विषाणूचा प्रसार भारतात,महाराष्ट्रातील शहरात गतीने पसरत आहे.करिता राज्यशासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे नांदेड जिल्ह्याकरिता संचारबंदी आदेश निर्गमित करण्यात आला आहे.तरी नांदेड जिल्हाचे क्षेत्र मोठा असून तालुक्याची संख्याही मोठी आहे व जिल्ह्याला लागूनचं विदर्भ,आंध्र,तेलंगाना इ भागाची सीमावर्ती भागानी व्यापलेला आहे.

तालुका हा नांदेड जिल्ह्याच्या टोकाला वसलेल्या आदिवासी व नक्षलग्रस्त तालुका म्हणून ओळख असलेल्या या तालुक्यातील समाविष्ट यंत्रणेचे जिल्ह्यधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचेकडून कौतुक यामध्ये तहसीलदार नरेंद्र देशमुख यांनी केलेल्या तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनाच्या अनुषंगाने शासनाने दिलेल्या वेळोवेळी निर्देशाप्रमाणे किनवट महसूल विभागाच्या अधिनस्त अधिकारी व नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी , अव्वलकारकून,तलाठी,लिपिक,शिपाई,पोलीसपाटील,कोतवाल,आदींनी या कालावधीत संचारबंदी काळात सहभाग घेऊन परराज्य/पर जिल्ह्यातून अडकून पडलेल्या लोकांचे अन्न व निवासाची व्यवस्था करणे, जीवनावश्यक वस्तूचा नियमित पुरवठा सुरळीत ठेवणे, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी कामे केली तर किनवट नगरपालिकेच्या मुख्याधिकारी श्री निलेश सुंकेवार यांना उद्देशून अभिनंदनपर पत्र देऊन त्याचेही कौतुक केले आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या संचारबंदी काळात किनवट शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावणे,ठीक ठिकाणी रोग प्रतिबंधात्मक औषधांची फवारणी करणे,शहरातील साफ सफाई करणे,स्वयंसेवी संस्थेशी संमनव्येय साधून प्राप्त गरजूना पोहचविणे इत्यादी बाबत केलेली कामगिरी कौतुकास्पद व अभिनंदनस्पद असून त्यांच्या अधिनस्त अधिकारी व कर्मचारी,यामध्ये प्रामुख्याने कर वसुली अधिकारी ,वैध्यकीय अधिकारी,स्वच्छता निरीक्षक,सफाई कामगार व जिल्हापरिषद इ विभागाच्या अधिकारी व कर्मचारी क्षेत्रीय स्तरावरील सर्व अधिकारी कर्मचारी या सर्वांनी केलेल्या सहकार्यामुळेच आपण आज पर्यंत सदर विषाणुचा प्रादुर्भाव जिल्ह्यांतर्गत होण्यास प्रतिबंध करू शकलो त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उत्तम नियोजन करून चांगले कामगिरी बजावलेल्या यंत्रनेच्या प्रमुखांना संबंधित विभाग प्रमुखाच्या नावे पत्र देऊन कौतुक करून यापुढेही अशाच प्रकारे कोरोना लढ्यात तत्परतेने कर्तव्य बजवाल अशी अपेक्षा जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी व्यक्त केली.
कोरोनाचा या काळात लोकप्रतिनिधीही तळ टोकून जिल्ह्यात कोरोना या महामारी आजारावर मात करण्यासाठी रात्रंदिवस काम करणाऱ्या नांदेडला लाभलेले जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर,जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर,मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर,नर्स,मेडिकल स्टॉप सह,पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनीही जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत.तसेच किनवट उपविभागाचे सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल(भा.प्र.से) यांनीही किनवट माहूर तालुक्यातील विविध भागात भेटी घेतल्यामुळे काही कामचुकार कर्मचारीही सरळ झाले आहेत.त्या सोबतच लोकप्रतिनिधीही आता मागे नाहीत याकरिता जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री मा.अशोकराव चव्हाण हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील,नांदेडच्या जिल्हापरिषद अध्यक्षा सौ.मंगाराणी अंबुलगेकर , किनवटचे आमदार भिमराव केराम यांनीही आपल्या मतदार संघात वैधकीय सेवेकरिता तात्काळ चाळीस लाखाचा निधी दिला असून विविध प्राथमिक आरोग्य केंद्राकरिता जणसामान्याकरिता अंबुलन्स उपलब्ध होण्याकरीता पाठपुरावा करीत आहेत,माजी आमदार प्रदीप नाईक , जिल्हापरिषद उपाध्यक्ष प्र.आकाश रेड्डी , समाधान जाधव,संतोष बोनलेवाड यांच्यासह जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनिधी सजग राहून आपआपल्या मतदार संघात अधिकाऱ्या समवेत भेटी देऊन आढावा घेत असल्याचे दिसून येत आहे.

Unlimited Reseller Hosting