Home विदर्भ न. प. उपाध्यक्ष सुभाष राय यांच्या तर्फे दररोज 1500 लोकांना भोजनदान

न. प. उपाध्यक्ष सुभाष राय यांच्या तर्फे दररोज 1500 लोकांना भोजनदान

342

यवतमाळ , दि. ०७ :- सामाजिक व राजकीय क्षेत्रात नावाजलेले यवतमाळ शहरातील दानशूर व्यक्तीमत्व तसेच यवतमाळ नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष व वर्तमान उपाध्यक्ष सुभाषभाऊ राय यांनी कोरोना महामारी च्या या संकट प्रसंगी पुढाकार घेत यवतमाळ शहरातील गरजू व गरीब नागरिकांसाठी भोजनदान उपक्रमाची सुरुवात स्थानिक बालाजी चौक यवतमाळ येथे दि. 6 मार्च पासून अविरतपणे 1500 पेक्षा जास्त लोकांना भोजनदान करण्याचा उपक्रम सुरु केला आहे.

विशेष म्हणजे न. प. चे उपाध्यक्ष सुभाष राय यांनी स्व खर्चातून कोरोना महामारी निमित्त भोजनदान हा उपक्रम सर्व सामान्य गोरगरीबांसाठी सुरु केला असून गरजू लाभार्थी या उपक्रमाचा लाभ घेत आहे. विशेष म्हणजे या उपक्रमाकरिता बालाजी दुर्गादेवी उत्सव मंडळ, बालाजी चौकातील शेकडो कार्यकर्त्यांचे सहकार्य मिळत असून सुभाषभाऊ राय यांनी सुरु केलेल्या या उपक्रमाबद्दल नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. सोशल डिस्टेसिंग ठेऊन गरजू गरीब लोकांना भोजनदान करण्यात आले तसेच विनाकारण घराबाहेर कोणीही फिरू नका, शासनाने दिलेल्या आदेश व सुचना नुसारच सर्व नागरिकांनी मार्गक्रमण करावे असे आवाहन ही न. प. चे उपाध्यक्ष सुभाष राय यांनी केले आहे. तर बालाजी दुर्गादेवी उत्सव मंडळाचे विजय राय यांचे सोबत कार्यकर्ते हे गरजू व गरीबांच्या घरापर्यंत जाऊन सुद्धा भोजनदान करीत असून भोजनदान कार्यक्रमासाठी मंडळाचे असंख्य कार्यकर्ते सरसावले आहे.