Home महाराष्ट्र जमाते इस्लामी हिंद यांनी २६७५ कुटुंबांना वाटप केले रेशनचे किट

जमाते इस्लामी हिंद यांनी २६७५ कुटुंबांना वाटप केले रेशनचे किट

168

(प्रतिनिधी लियाकत शाह)
जमाते इस्लामी हिंद यांनी औरंगाबाद शहरात १२ लाख ७५ हजार रुपयाचे वाटप केले अन्नधान्य नैसर्गिक आपत्ती असो किंवा देशावर आलेले संकट नेहमी जमातचा असतो खारीचा वाटा औरंगाबाद, नैसर्गिक आपत्ती असो किंवा देशावर आलेले कोणत्याही संकटात नेहमी देशवासीयांना मदत करण्यासाठी जमाते इस्लामी हिंदचा खारीचा वाटा असतो. देशात कोठे दंगल झाली त्यामध्ये दंगलग्रस्तांना, पूरग्रस्तांना नेहमी पिडीतांना आपल्या परिने मदत करुन दिलासा देण्याचा प्रयत्न जमातचा असतो. मानवतेसाठी मागील अनेक वर्षांपासून जमाते इस्लामी हिंद भारत देशात काम करत आहे. यावेळी कोरोनाचे संकट देशावर ओढवले असताना १४ एप्रिल पर्यंत केंद्र सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला अशावेळी सर्व व्यापार धंदे, मोलमजुरी बंद असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी जमात पुढे आली. मस्जिद बंद करुन घरीच नमाज अदा करु शकतात असा समाजात आत्मविश्वास निर्माण केला. गरजूंना व त्याच्या कुटुंबावर भुकेले राहण्याची वेळ येवू नये यासाठी शहरात २६७५ कुटुंबांना शासनाची परवानगी घेवून घरपोच रेशनचे व किराणा सामानचे किट सोशल डिस्टन्स ठेवत वाटप करण्यात आले. प्रसिध्दीसाठी जमात काम करत नाही त्यांनी कधी किट वाटप करताना छायाचित्रे काढली नाही तर मानवतेसाठी काम करत सर्व जाती धर्मातील गरजूंना किटचे वाटप केले. एकूण १२ लाख ७५ हजार रुपयांचे अन्नधान्य औरंगाबाद शहरात वाटप करण्यात आले आहे शहराध्यक्ष इंजि. वाजेद कादरी यांनी दिली आहे. त्यांनी सांगितले २३ मार्च ते २ एप्रिल पर्यंत २६७५ रेशनचे कीट वाटप झाले आहे अजून हे काम १४ एप्रिल पर्यंत निरंतर सुरुच राहणार आहेत.